बुलडाणा जिल्ह्यातील ६४० संगणक चालकांचे आठ महिन्यांचे वेतन थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 05:38 PM2018-02-28T17:38:34+5:302018-02-28T17:38:34+5:30

 धोत्रा नंदई (जि. बुलडाणा) : गेल्या सात ते आठ महिन्यानचे वेतन थकल्यामुळे जिल्ह्यातील ६४० ‘आपले सरकार’ सेवा केंद्र परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Eight months salary of 640 computer operators in Buldhana district pending | बुलडाणा जिल्ह्यातील ६४० संगणक चालकांचे आठ महिन्यांचे वेतन थकीत

बुलडाणा जिल्ह्यातील ६४० संगणक चालकांचे आठ महिन्यांचे वेतन थकीत

Next
ठळक मुद्दे शासनाच्या मिळणाऱ्या  विविध योजना नागरिकांना गावपातळीवर मिळाव्यात याकरीता आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आले. . आपले सरकार केंद्र चालक म्हणून सुशिक्षीत बेरोजगार युवकांना गुणवत्तेनुसार यामध्ये समाविष्ट करुन घेण्यात आले. परंतु मागील सहा ते सात महिन्याच्या कालावधीपासून  वेतन थकल्यामुळे आपले सरकार केंद्र चालकासह त्यांच्या कुटुंबावरही उपासमारीची वेळ आली आहे.

- गजानन भालेकर

 धोत्रा नंदई (जि. बुलडाणा) : गेल्या सात ते आठ महिन्यानचे वेतन थकल्यामुळे जिल्ह्यातील ६४० ‘आपले सरकार’ सेवा केंद्र परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आपल्या समस्या मार्गी लावण्यासाठी केंद्र चालक येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर धडक देणार आहेत.
महा-आॅनलाईन कंपनीचा शासनाशी असलेला करार संपल्याने संगणक परिचालकांचे समायोजन आपले सरकार सेवा केंद्र चालक म्हणून करण्यात येवून त्यांना डिसेंबर २०१६ मध्ये नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यामुळेकाम पुन्हा नव्या जोमाने सुरू झाले आहे. त्यानंतर डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी २०१६ या तीन महिन्याचे वेतन (सीएससी) एसपीव्ही कंपनीकडून शासनाच्या करारानुसार देण्यात आले. परंतु त्यानंतर मार्च, एप्रील, मे, जून, जुलै व आॅगस्ट या सहा महिन्याचे वेतन तब्बल सहा महिन्यानंतर सप्टेंबर २०१७ मध्ये देण्यात आले. त्यानंतर आॅक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी फेब्रुवारी २०१८ या महिन्याचे वेतन सिएससी कंपनीच्या मनमानी कारभारामुळे देण्यात आलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ६४० आपले सरकार सेवा केंदचालकावर उपासमारीची वेळ आली आहे.
ग्रामपंचायतच्या जमाखर्चाचा आॅनलाईन लेखा-जोखा, जन्म-मृत्युच्या नोंदी या सहा विविध दाखल्यांच्या आॅनलाईन नोंदी तसेच महाराष्ट्र शासनाच्या मिळणाऱ्या  विविध योजना नागरिकांना गावपातळीवर मिळाव्यात याकरीता आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात आले. यामध्ये शेतकºयांचे कर्ज माफीचे आॅनलाईन अर्ज देखील आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून भरण्यात आले आहे. यामुळे बुलडाणा जिल्हा अमरावती विभागातून अर्ज भरण्यात अव्वल आहे. ग्रामपंचायतने जिल्हा परिषदेला आपले सरकार सेवा केंद्राचा निधी वर्ग केलेला असतानाही केंद्र चालकांना आपले वेतन मिळालेले नसल्याने कंपनीवर रोष व्यक्त करण्यात येत आहे. आपले सरकार केंद्र चालक म्हणून सुशिक्षीत बेरोजगार युवकांना गुणवत्तेनुसार यामध्ये समाविष्ट करुन घेण्यात आले. त्यांना महिनाभराचे वेतन म्हणून सहा हजार रुपये देण्यात येतात. त्यावर त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. परंतु मागील सहा ते सात महिन्याच्या कालावधीपासून  वेतन थकल्यामुळे आपले सरकार केंद्र चालकासह त्यांच्या कुटुंबावरही उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे तात्काळ जिल्ह्यातील सर्व केंद्र चालकाचे थकीत असलेले वेतन कंपनीने काढण्याची गरज निर्माण झाली आहे. याची संबंधित विभागाने त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी संगणग परिचालक संघटनेचे मंगेश खराट, गणेश काकड, नंदू मुंढे, राज पटावकर , मिलन शेळके यांनी केली आहे.

चौदा वित्त आयोगातून आपले सरकार सेवा केंद्राची रक्कम जमा
देऊळगाव राजा तालुक्यातील ग्रामपंचायत जवळखेड, धोत्रानंदई, शिवणी आरमाळ, रोहणा, नागणगाव, उंबरखेड, पाडळी शिंदे, पिंपळगाव चिलमखा या ग्रामपंचायतच्या केंद्र चालकांना गेली पाच ते आठ महिन्यापर्यंतचे कोणतेच मानधन मिळाले नाही. तसेच या ग्रामपंचयतींनी चौदा वित्त आयोगामधून जिल्हा परिषदेला आपले सरकार सेवा केंद्राची रक्कम जमा केलेली असून सुद्धा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे या सर्व केंद्रचालकांचे मानधन झालेले नाही.

दोन दोन, तीन तीन ग्रामपंचायतीचा कारभार एकाच संगणक परिचालकाकडे देऊन त्यांची आर्थिक पिळवणूक करण्यात येत आहे. याबाबत वरित दखल घेवून न्याय देण्याची गरज आहे.
-मंगेश खराट, अध्यक्ष, संगणक परिचालक संघटना, देऊळगाव राजा.
 

Web Title: Eight months salary of 640 computer operators in Buldhana district pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.