गणेश विसर्जनादरम्यान युवकाचा डोहात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 09:29 AM2018-09-24T09:29:50+5:302018-09-24T09:30:11+5:30

संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी गाव वसाळी येथील एक 22 वर्षीय युवक घरातील गणेश विसर्जन करण्याकरिता गेला असता नदीत बुडाला.

During Ganesh immersion, the youth drowned in the dawn | गणेश विसर्जनादरम्यान युवकाचा डोहात बुडून मृत्यू

गणेश विसर्जनादरम्यान युवकाचा डोहात बुडून मृत्यू

Next

- अजहर अली
संग्रामपूर : संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी गाव वसाळी येथील एक 22 वर्षीय युवक घरातील गणेश विसर्जन करण्याकरिता गेला असता नदीत बुडाला. ही घटना अंबाबरवा अभयारण्याजवळील बंदर झिरा नदीत रविवारी रात्री 8 वाजता दरम्यान घडली. रघुनाथ जानराव पालकर हा युवक गावातील युकांसोबत अंबाबरवा अभयारण्यजवळील बंदर झिरा नदीत घरातील गणपती विसर्जन करण्याकरिता गेला होता. सोबतचे सर्व युवक विसर्जन करून निघून आले हा मागे थांबून होता.

अंबाबरवा अभयारण्यातील दोन महीला कर्मचारी जंगलातून येत असताना त्यांना डोहाजवळ कपडे आढळून आले. त्यांनी वसाळी येथील ग्रामस्थांना नदीतील डोहाजवळ कपडे दिसून येत असल्याची माहिती दिली. लगेच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता नदीतील डोहात हा युवक बुडलेला आढळून आला. सदर घटनेची माहिती सोनाळा पोलिस स्टेशनला देण्यात आली असून, रात्री 11 वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. सोमवारी सकाळी त्या युवकाला बाहेर काढण्यात येणार आहे. शवविच्छेदन करून अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

Web Title: During Ganesh immersion, the youth drowned in the dawn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.