बुलडाणा जिल्ह्यातील दोघींचा नाशिक जिल्हय़ातील कादवा नदीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 11:57 PM2018-01-02T23:57:38+5:302018-01-03T00:02:07+5:30

नाशिक :  सुई पोत विकून पोट भरण्यासाठी बुलडाणा जिलतून आलेल्या मावशी व भाचीचा अवनखेड येथे कादवा नदीत बुडून मृत्यू झाला. देऊळगाव राजा (जि. बुलढाणा) येथून ताईबाई जानराव शिवरकर (४५)  व लता राजू हटकर (२५)  या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा येथे कुटुंबासह आल्या होत्या. तेथे रस्त्याच्या कडेला पाल टाकून त्या राहत होत्या.

Due to drowning in the river Kudva river of Buldhana district | बुलडाणा जिल्ह्यातील दोघींचा नाशिक जिल्हय़ातील कादवा नदीत बुडून मृत्यू

बुलडाणा जिल्ह्यातील दोघींचा नाशिक जिल्हय़ातील कादवा नदीत बुडून मृत्यू

Next
ठळक मुद्देमृत पावलेल्या दोघी जणी देऊळगाव राजा येथील रहिवासीदिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा येथे रस्त्याच्या कडेला कुटुंबासह पाल टाकून त्या राहत होत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक/बुलडाणा :  सुई पोत विकून पोट भरण्यासाठी बुलडाणा जिलतून आलेल्या मावशी व भाचीचा अवनखेड येथे कादवा नदीत बुडून मृत्यू झाला. देऊळगाव राजा (जि. बुलढाणा) येथून ताईबाई जानराव शिवरकर (४५)  व लता राजू हटकर (२५)  या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा येथे कुटुंबासह आल्या होत्या. तेथे रस्त्याच्या कडेला पाल टाकून त्या राहत होत्या. दिवसभर सुया, पोत आदी साहित्य विकून चरितार्थ भागवित होत्या. मंगळवारी सकाळी त्या सुई पोत विक्र ीसाठी दुपारी गेल्या मात्न सायंकाळपर्यंत परत न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला. त्यावेळी अवनखेड येथे परमोरीच्या बाजूने त्यांच्या चप्पल कादवा नदीतीरी आढळून आल्या.   त्यावरून त्या पाण्यात बुडाल्याचा संशय आला.  दिंडोरी पोलिसांना याबाबत खबर देण्यात आली. 

लता हिस अवघ्या दहा महिन्यांची मुलगी 
पोलीस तातडीने  घटनास्थळी दाखल होत  ग्रामस्थांच्या मदतीने पाण्यात शोध मोहीम राबविण्यात आली.    ग्रामस्थ चंदू वामन बेडकुळे यांनी पाण्यात शोध घेतला असता त्यांनी एकीचा मृतदेह पाण्यातून काढला.     यानंतर काही वेळाने दुसराही मृतदेह शोधण्यात यश आले. मयत लता हिस अवघ्या दहा महिन्यांची मुलगी असून या घटनेने नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. दिंडोरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे .
 

Web Title: Due to drowning in the river Kudva river of Buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.