दुष्काळ जाहीर करण्याची शासनाकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 12:22 AM2017-08-18T00:22:13+5:302017-08-18T00:22:51+5:30

खामगाव: घाटाखालील विविध तालुक्यात पिकांची परिस् िथती पावसाअभावी गंभीर बनलेली आहे. त्यामुळे आता  विविध तालुक्यांमधून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी  शासनाकडे करण्यात येत आहे.

The demand of the government to announce the drought | दुष्काळ जाहीर करण्याची शासनाकडे मागणी

दुष्काळ जाहीर करण्याची शासनाकडे मागणी

Next
ठळक मुद्देजळगाव जामोद, शेगावात तहसीलदारांना निवेदन विविध तालुक्यात पीक परिस्थिती गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: घाटाखालील विविध तालुक्यात पिकांची परिस् िथती पावसाअभावी गंभीर बनलेली आहे. त्यामुळे आता  विविध तालुक्यांमधून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी  शासनाकडे करण्यात येत आहे.

जळगाव जामोद: दुष्काळ जाहीर करण्याची शिवसेनेची  मागणी
गत दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप  िपकांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. अनेक शेतकर्‍यांचा  लागवडीचा खर्च निघणे कठीण झाले आहे. काही शे तकर्‍यांना पिकांवर वखर फिरवल्याशिवाय गत्यंतर नाही.  त्यामुळे शेतकरी हा हवालदिल झाला आहे. या पृष्ठभूमीवर  जळगाव जामोद तालुका  दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात  यावा, अशी मागणी एका निवेदनाद्वारे शिवसेनेने केली  आहे. 
उपविभागीय महसूल अधिकारी धनंजय गोगटे यांना १४  ऑगस्टला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, तालुका प्रमुख गजानन वाघ, शहर प्रमुख कैलाससिंह सोळंके,  विधानसभा संपर्कप्रमुख आबासाहेब पतंगे, उपजिल्हाप्रमुख  शांताराम दाणे, तालुका उपप्रमुख देवीदास घोपे, माजी  तालुकाप्रमुख संतोष दांडगे, माजी न.प. उपाध्यक्ष तुकाराम  काळपांडे, माजी उपसभापती विजय काळे, नगरसेवक  रमेश ताडे, खविसं उपाध्यक्ष संजय भुजबळ, वासुदेव  क्षीरसागर, शुभम पाटील, पवन पाटील, उपशहरप्रमुख  योगेंद्र पांधी, पुंडलिक पाटील, शिवाल पाटील व पवन  तेलंगडे यांनी निवेदन दिले. 

शेगावात भारिपचे  तहसीलदारांना निवेदन 
कमी पावसामुळे सध्या तालुक्यात दुष्काळी स्थिती निर्माण  झाली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शे तकर्‍यांची  दुबार-तिबार पेरणी वाया गेली. पिके वाळत  असून, ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाईसुद्धा निर्माण झाली  आहे. म्हणून शेगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा  आणि शेतकरी बांधवांना मदत देण्यात यावी, अशी मागणी  शहर व तालुका भारिप बहुजन महासंघाच्या वतीने  तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी पं.स. सभापती विठ्ठलराव पाटील, जि. प. सदस्य  तथा तालुकाध्यक्ष राजाभाऊ भोजने, पं. स. उपसभापती  सुखदेव सोनोने, युवा नेते नीळकंठ पाटील, तालुका सचिव  श्रीकृष्ण गवई, शहराध्यक्ष मिलिंद शेगोकार, दादाराव  शेगोकार, नगरसेवक राजेंद्र शेंगोकार यांच्यासह भारिप  बमसं पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते.

पातुर्डा परिसरातही दुष्काळ जाहीर करा
पिकांच्या ऐन उभारीच्या वेळेस पावसाचा ठणठणाट  असल्याने पातुर्डा परिसरावर दुष्काळाची छाया पसरली  आहे. त्यामुळे या भागातही दुष्काळ जाहीर करण्याची  मागणी होत आहे. पावसाळ्याचे अडीच महिने व श्रावण  महिना कोरडा गेला. आता या आठवड्यात पाऊस सक्रिय  न झाल्यास पातुर्डा परिसर दुष्काळाच्या गर्तेत ढकलला  जाईल इतकी विदारक स्थिती यावर्षी झाली आहे. शासनाने  यावर्षी कर्जमाफीची घोषणा केली. त्याचे भिजत घोंगडे  आहे. नव्याने कर्जपुरवठा झालाच नाही. पेरणीसाठी  शासनाने देऊ केलेले दहा हजार अद्यापही मिळाले नाहीत.  गेल्यावर्षीच्या खर्चाची तोंडमिळवणी करत उधारीवर बी- बियाणे खरेदी करून पेरण्या उकरल्या. अपुर्‍या पावसात  पेरण्या उलटल्या. दुबार पेरण्या कराव्या लागल्या. मोफत  बियाणे व बांधावर खत यासारख्या शासनाच्या योजना  फसव्या ठरल्या. तुरळक पावसावर पिके तग धरू लागली  होती; मात्र गेल्या तीन आठवड्यांपासून पाऊस गायब  झाला. अशातच वाढत्या उष्णतामुळे पिके करपली. उडीद,  मूग ही आंतर पिके गेल्यातच जमा आहेत. सोयाबीनच्या  फुलधारणेवर पाऊस नसल्याने तेही करपले. वाढत्या उष्ण तेमुळे व अपुर्‍या पावसामुळे जमिनीला चिरे पडले. पिकांची  मुळे तुटल्याने हिरवे पीक कोमेजू लागले आहे. पातुडर्य़ात  यावर्षी जूनमध्ये ६0 मिमी, जुलैमध्ये ८0 मिमी तर  ऑगस्टमध्ये अवघा १0 मिमी इतका पाऊस पडला. त्यामुळे  पातुर्डा परिसरातील शेतकरी संकटात सापडला असून,  शासनाने याची दखल घेऊन तत्काळ दुष्काळ घोषित  करावा व दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचा हात द्यावा,  अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. 

Web Title: The demand of the government to announce the drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.