खामगाव दंगलप्रकरणी काँग्रेस नगरसेवकासह ३१ जणांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:14 PM2018-05-15T13:14:30+5:302018-05-15T13:14:30+5:30

खामगाव:  स्थानिक शिवाजी नगर भागात सोमवारी रात्री उसळलेल्या दंगल प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी काँग्रेस नगरसेवकासह ३१ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Crime against 31 people including Congress corporator in Khamgaon riots | खामगाव दंगलप्रकरणी काँग्रेस नगरसेवकासह ३१ जणांविरोधात गुन्हा

खामगाव दंगलप्रकरणी काँग्रेस नगरसेवकासह ३१ जणांविरोधात गुन्हा

googlenewsNext
ठळक मुद्देशहरातील शिवाजी नगर भागात कबड्डी स्पर्धेच्या वादातून दोन गटांमध्ये तणाव धूमसत आहे. सोमवारी रात्री सोमवारी रात्री १०.४० वाजता मिरवणुकीत हातवारे करण्याच्या इशाऱ्यावरून या वादाला खतपाणी मिळाले. यावेळी झालेल्या दगडफेकीत एक जण गंभीर जखमी झाला असून, दोन पोलिस कर्मचारीही जखमी झाले.

खामगाव:  स्थानिक शिवाजी नगर भागात सोमवारी रात्री उसळलेल्या दंगल प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी काँग्रेस नगरसेवकासह ३१ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण शांतता असून, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी भेट दिली.

शहरातील शिवाजी नगर भागात कबड्डी स्पर्धेच्या वादातून दोन गटांमध्ये तणाव धूमसत आहे. दरम्यान, सोमवारी रात्री सोमवारी रात्री १०.४० वाजता मिरवणुकीत हातवारे करण्याच्या इशाऱ्यावरून या वादाला खतपाणी मिळाले. परस्पर विरोधी दोन्ही गट आमने सामने झाले. यावेळी झालेल्या दगडफेकीत एक जण गंभीर जखमी झाला असून, दोन पोलिस कर्मचारीही जखमी झाले. घटनेची माहिती समजताच शहर पोलिसांसह शिवाजीनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ताबडतोब परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. रात्रीच उप विभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी खामगाव विभागातील शेगाव, हिवरखेड, जलंब, पिंपळगाव राजा येथील पोलिसांची अतिरिक्त कुमुक घटनास्थळी तैनात करण्यात आली. जखमी पोलिस कर्मचाऱ्यांसह या घटनेत गंभीर जखमी असलेल्या एका इसमालाही खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.  दरम्यान, सकाळी पुन्हा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले, शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे सुनील हुड,  पोलिस कल्याण निधीचे उत्तमराव जाधव,  खामगाव ग्रामीणचे ठाणेदार रफीक शेख, एपीआय तावडे, लांडे, शक्करगे यांच्यासह पोलिस घटनास्थळी तळ ठोकून होते. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.

 

काँग्रेस नगरसेवकासह ३१ जणांविरोधात गुन्हा

पीएसआय चंद्रकांत बोरसे यांच्या तक्रारीवरून नगरसेवक प्रविण कदम, अश्विन खंडागळे, सूरज बोरकर, सूरज साबळे, अनिकेत जवंजाळ,  उमेश कदम, शैलेश सोले, ओम कदम, भवर सर्व रा. शिवाजी नगर, भाऊ ताराचंद बिडकर, रमेश जाधव, सोनू तिवारी, राजेश मिश्रा, सचिन यादव, राहुल ठोंबरे, गोलु मुधोळकर यांच्यासह १५ जणांविरोधात कलम १४७, १४८, १४९, ३५३, ३२३, ४२७, ३३६ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.


 

नगरसेवक कदम फरार: चार आरोपी अटकेत

पोलिस उपनिरिक्षक चंद्रकांत बोरसे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर घटनास्थळावरून अश्विन खंडागळे, अनिकेत जवंजाळ, रमेश जाधव, सचिन यादव या चौघांना अटक करण्यात आली असून, घटनेचा सुत्रधार नगरसेवक प्रविण कदम फरार असल्याचे समजते. पोलिस नगरसेवक कदम याच्या मागावर असल्याचे समजते.


 

सोमवारी रात्री शिवाजी नगर भागात घडलेली घटना अतिशय दुर्देवी आहे. पोलिसांनी वेळीच ही दंगल नियंत्रणात आणली असून, शहरात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यास नागरिकांनी सहकार्य करावे. कुणीही अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे.

- प्रदीप पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी, खामगाव

Web Title: Crime against 31 people including Congress corporator in Khamgaon riots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.