सिंदखेडराजा तालुक्यात कपाशीच्या सर्वेक्षणासाठी शेतकरी अधिकार्‍यांच्या प्रतीक्षेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:39 AM2017-12-25T00:39:30+5:302017-12-25T00:40:38+5:30

सिंदखेडराजा: तालुक्यात सर्वाधिक पेरा हा कपाशीचा असून, यावर्षी बोंडअळीच्या हल्ल्यात हजारो हेक्टरवरील कपाशी गळून पडली आहे. या कपाशीचा सर्वेक्षण करण्याचा आदेश शासनाने दिला असून, पटवारी आणि कृषी सहायक थेट बांधावर जाऊन पाहणी करण्यापेक्षा धाब्यावर बसून अहवाल तयार करीत आहेत. त्यामुळे कपाशी उत्पादक शेतकरी नुकसानाचे सर्वेक्षण करणार्‍या अधिकार्‍यांच्या प्रतीक्षेत आहेत. 

Cotton survey waiting for farmers' officials! | सिंदखेडराजा तालुक्यात कपाशीच्या सर्वेक्षणासाठी शेतकरी अधिकार्‍यांच्या प्रतीक्षेत!

सिंदखेडराजा तालुक्यात कपाशीच्या सर्वेक्षणासाठी शेतकरी अधिकार्‍यांच्या प्रतीक्षेत!

Next
ठळक मुद्देबांधावर जाऊन पाहणी न करता धाब्यावर बसून अहवाल 

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा: तालुक्यात सर्वाधिक पेरा हा कपाशीचा असून, यावर्षी बोंडअळीच्या हल्ल्यात हजारो हेक्टरवरील कपाशी गळून पडली आहे. या कपाशीचा सर्वेक्षण करण्याचा आदेश शासनाने दिला असून, पटवारी आणि कृषी सहायक थेट बांधावर जाऊन पाहणी करण्यापेक्षा धाब्यावर बसून अहवाल तयार करीत आहेत. त्यामुळे कपाशी उत्पादक शेतकरी नुकसानाचे सर्वेक्षण करणार्‍या अधिकार्‍यांच्या प्रतीक्षेत आहेत. 
तालुक्यात सोयाबीननंतर कपाशी हे मुख्य पीक शेतकरी मोठय़ा प्रमाणात घेतात. कधी खोड अळी तर कधी बोंडअळीने कपाशीचे पीक फस्त होते. लाल्यावर संपूर्ण शेतच फस्त होते. कपाशीवर दरवर्षी कोणते ना कोणते संकट ठरलेले असतेच. यावर्षी कपाशीला पेरणीयोग्य पाऊस पडला. रोपटीही चांगल्याप्रकारे बहरली होती. फुलही मोठय़ा प्रमाणात आली. पहिली वेचणी झाली आणि उर्वरित बोंडात बोंडअळीने प्रवेश केला. एक-एक करीत शेतात कापसाऐवजी बोंडीची गळती सुरू झाली आणि अवघ्या १५ दिवसात कपाशीला फक्त पानेच शिल्लक राहिली. २५ हजार हेक्टरवर ही संक्रांत आल्याने शेतकर्‍यांच्या उत्पादनाचा मार्गच खुंटला. कपाशीच्या पेरणीनंतर ९0 दिवसांनी बोंडअळी पडते, असे कृषी अधिकारी कंपनीच्या पत्रकांवरून सांगत असले तरी कपाशीला मुळात फुले लागतात आणि नंतर फळधारणा होते. कपाशी फुलायला १0 ते १५ दिवस, त्यानंतर येणारी फुले, फळे असा एकूण जून ते डिसेंबर हा सहा महिन्याचा कालावधी लागतो. ओलीत कपाशीला आठ महिनेही लागतात. यावर्षी मात्र बोंडअळीने संपूर्ण क्षेत्रच व्यापल्याने झडती ५0 टक्केपेक्षा कमी झाली आहे. आ.डॉ. शशिकांत खेडेकर यांनी शेतकर्‍यांची बाजू मांडत संपूर्ण कापूस उत्पादक शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन सर्वेक्षण करण्याची मागणी केली आणि त्यांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून विधिमंडळातही प्रश्न उपस्थित केला.
शासनाच्या आदेशानुसार सात भागात टीम तयार करून पटवारी, कृषी सहायकांना बांधावर जाऊन नुकसानीचा अहवाल तयार करण्याचे आदेश तहसीलदार संतोष कणसे यांनी दिले. काही पटवारी बांधावर जाऊन अहवाल तयार करीत आहेत तर काही कृषी सहायक आणि पटवारी राजकीय पुढार्‍यांना हाताशी धरून धाब्यावर बसून अहवाल तयार करीत असल्याचा प्रकार दिसून येत आहे. त्यामुळे ज्यांच्या शेतात कपाशीची बोंडही नाही अशा बड्या शेतकर्‍यांची नावे नुकसानग्रस्त यादीत येण्याची शक्यता बळावली आहे. धाब्यावर बसून सर्वेक्षण करणार्‍या कर्मचार्‍यांना समज देऊन वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करण्याची मागणी दिलीप आश्रू इंगळे, प्रल्हाद खरात यासह शेकडो शेतकर्‍यांनी केली आहे.  

Web Title: Cotton survey waiting for farmers' officials!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.