ग्रेडींग केलेला उडीद विकून शेतकऱ्यांचे चुकारे द्या - रयत क्रांती संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 04:28 PM2018-07-06T16:28:19+5:302018-07-06T16:29:21+5:30

शेतकऱ्यांना त्यांचे चुकारे देण्यात यावे तसेच हरभरा, तुरीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे आणि शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी आॅनलाईन नोंद करण्यात यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्यावतीने एका निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. 

clear farmer pending bill | ग्रेडींग केलेला उडीद विकून शेतकऱ्यांचे चुकारे द्या - रयत क्रांती संघटनेची मागणी

ग्रेडींग केलेला उडीद विकून शेतकऱ्यांचे चुकारे द्या - रयत क्रांती संघटनेची मागणी

Next
ठळक मुद्देयाबाबत रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उडीद उत्पादक शेतकऱ्यांसह ४ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदन दिले. मागणी जिल्हाधिकारी व जिल्हाउपनिबंधक यांच्याकडे करण्यात आली असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.


लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : चिखली जिनिंगने खरेदी केलेला निकृष्ट उडीद ग्रेडींग मशीन लावून उत्कृष्ट करणे सुरू आहे. तो उडीद विकून अथवा वेअर हाऊसला साठवून प्रामाणिक शेतकऱ्यांना त्यांचे चुकारे देण्यात यावे तसेच हरभरा, तुरीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे आणि शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी आॅनलाईन नोंद करण्यात यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्यावतीने एका निवेदनाव्दारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. 
याबाबत रयत संघटनेच्या पदाधिकाºयांनी उडीद उत्पादक शेतकऱ्यांसह ४ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदन दिले. यामध्ये शासनाने हमीभाव देऊन उडीद खरेदी केला होता. मात्र, चिखली जिनिंग संस्थेचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी व्यापाऱ्यांशी हातमिळवणी करून जुना व निकृष्ठ उडीद खरेदी केल्यामुळे उत्कृष्ठ दर्जाचा माल देणाºया प्रामाणिक शेतकऱ्यांच्या उडीदाचे चुकारे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून अडकल्याचा आरोप केला आहे. तसेच तूर व हरभरा या शेतमालाचेही पैसे अद्याप खात्यात जमा होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले असल्याने चिखली सेंटरवर ग्रेडींग सुरु असलेल्या उडदाचा पंचनामा करण्यात यावा, जे शेतकरी तूर, हरभरा हमीभावाने देऊ शकले नाही ते अनुदानापासुन वंचीत राहु नये, यासाठी रजीस्टर नोंद असलेल्याचे शेतकऱ्यांच्या आॅनलाईन नोंदी करण्यात याव्यात, रखडलेले पैसे त्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा, व ग्रेडींग सुरु असलेला उडीद विकूण अथवा वेअर हाऊसला साठवून शेतकऱ्यांचे रखडलेले उडदाचे चुकारे देण्यात यावे, व संपुर्ण प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी व जिल्हाउपनिबंधक यांच्याकडे करण्यात आली असून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी विनायक सरनाईक, संतोष राजपुत, अनिल चौहाण, विलास तायडे, जिजा संजय थोरात, शिवाजी पंडीत, अरूण तायडे, दुर्गाबाई तायडे, गोकुळ धनावत, रमेश पाटिल गवते, भास्कर काळे, गजानन पवार, गजानन गाडेकर, मदन काळे आदींसह शेतकरी उपस्थीत होते. (तालुका प्रतिनिधी)
कॅप्शन : निवेदन देताना रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी.

Web Title: clear farmer pending bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.