Buldhana: गुप्ती मारून जखमी करणाऱ्यास सश्रम कारावासाची शिक्षा, पाच हजारांचा ठोठावला दंड  

By अनिल गवई | Published: March 22, 2024 08:22 PM2024-03-22T20:22:19+5:302024-03-22T20:23:38+5:30

Buldhana Crime News: जिवे मारण्याच्या उद्देशाने गुप्ती मारून जखमी करणाऱ्या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खामगाव येथील कोर्ट क्रमांक ३ चे न्यायदंडाधिकारी व्ही.व्ही. राजूरकर यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. 

Buldhana: Punishment of Rigorous Imprisonment, Fine of Rs. | Buldhana: गुप्ती मारून जखमी करणाऱ्यास सश्रम कारावासाची शिक्षा, पाच हजारांचा ठोठावला दंड  

Buldhana: गुप्ती मारून जखमी करणाऱ्यास सश्रम कारावासाची शिक्षा, पाच हजारांचा ठोठावला दंड  

-अनिल गवई 
खामगाव - जिवे मारण्याच्या उद्देशाने गुप्ती मारून जखमी करणाऱ्या आरोपीस तीन वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खामगाव येथील कोर्ट क्रमांक ३ चे न्यायदंडाधिकारी व्ही.व्ही. राजूरकर यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. 

खामगाव तालुक्यातील उमरा येथील श्रीरंग पन्हाळकर यांनी २८ सप्टेंबर २०१२ रोजी हिवरखेड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार २७ सप्टेंबर २०१२ रोजी ते घरी असताना त्यांच्या रामेश्वर नामक मुलाने त्यांना महादेव जगदेव घोरपडे (३७), रा. अटाळी हा शेतातील तीळ चोरून नेत आहे. त्याला हटकले असता जिवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ करीत असल्याचे फोनवरून सांगितले. त्यानंतर या सर्व प्रकार माझा भाचा अरविंद मुळीक यांना सांगितला. गजानन कदम आणि माझे भाच्यासह शेताच्या दिशेने निघाल्यानंतर आरोपी महादेव घोरपडे हा गावातील शे. अस्लम यांच्या शेताजवळ भेटला. त्याला या प्रकाराबाबत विचारणा केली असता त्याने वाद घालून झटापट केली. त्याच्या जवळील गुप्तीने भाचे अरविंद याच्या बरगडीत मारून जखमी केले. तसेच, त्याला आवरण्यास गेलो असता माझ्या दंडावर गुप्ती मारून जखमी केले.

त्यावेळी गजानन कदम यांनी वाद सोडविल्याचे तक्रारीत म्हटले. या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी आरोपी विरोधात भादंवि कलम ३२४, ३२६, ५०४, ५०६, नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. याप्रकरणी गुन्हा सिद्ध झाल्याने सुनावणी दरम्यान न्यायालयाने दहा साक्षीदार तपासले. अभियोग पक्षातर्फे विशेष सहायक सरकारी अभियोक्ता अजय इंगळे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश व्ही.व्ही. राजूरकर यांनी आरोपीस भादंवि कलम ३२६ मध्ये दोषी ठरवून तीन वर्षे सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना कारावास व दंडाच्या रकमेतून चार हजार रुपये जखमी अरविंद मुळीक यास नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला.

Web Title: Buldhana: Punishment of Rigorous Imprisonment, Fine of Rs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.