बुलडाणा जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत ११ टक्के पावसाची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 04:38 PM2018-07-29T16:38:38+5:302018-07-29T16:41:17+5:30

गतवर्षी आजच्या तारखेत पडलेल्या पावसाशी त्याची तुलना करता ११.४२ टक्के पावसाची तुट जिल्ह्यात असल्याचे वरकरणी दिसत आहे.

Buldhana district receives 11% less rain than last year | बुलडाणा जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत ११ टक्के पावसाची तूट

बुलडाणा जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत ११ टक्के पावसाची तूट

Next
ठळक मुद्देनांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, बुलडाणा आणि खामगाव या तालुक्यामध्ये पावसाची ही तूट ३३ टक्क्यापासून ते १७ टक्क्यापर्यंत आहे.अपेक्षीत असा पाऊस न झाल्यास जिल्ह्यातील पिकोत्पादनासाह पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत आहे. शेतकरी पावसाची आजच्या तारखेतील ११.४२ टक्के तूट पाहता काहीसा चिंतेत पडला आहे.

बुलडाणा : पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला असला तरी जिल्ह्यात अद्याप वार्षिक सरासरीच्या ३७.५० टक्केच पाऊस झाला आहे. गतवर्षी आजच्या तारखेत पडलेल्या पावसाशी त्याची तुलना करता ११.४२ टक्के पावसाची तुट बुलडाणा जिल्ह्यात असल्याचे वरकरणी दिसत आहे. त्यातच प्रकल्पांमधील जलसाठ्यांमध्ये यंदाच्या पावसाळ््यात भरीव अशी भर न पडल्याने ९१ प्रकल्पही तळाला लागलेले आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत जिल्ह्यात ४९ टक्के पाऊस पडला. नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, बुलडाणा आणि खामगाव या तालुक्यामध्ये पावसाची ही तूट ३३ टक्क्यापासून ते १७ टक्क्यापर्यंत आहे. त्यामुळे पावसाळ््यातील आगामी दोन महिन्यात अपेक्षीत असा पाऊस न झाल्यास जिल्ह्यातील पिकोत्पादनासाह पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनण्याची शक्यता नाकारता येत आहे. दुसरीकडे जिल्ह्यात जवळपास सात लाख हेक्टरवर शेतकर्यांनी पेरणी केली आहे. मधल्या दोन दिवसात जिल्हयात झालेल्या सार्वत्रिक पावसाने पिकांना जिवदान दिले आहे. त्यातच जिल्ह्यात बोंडअळीचा प्रकोप सुरू झाल्याचे चित्र असताना धास्तावलेला शेतकरी पावसाची आजच्या तारखेतील ११.४२ टक्के तूट पाहता काहीसा चिंतेत पडला आहे. साधारणत: जुलै महिना हा बुलडाणा जिल्ह्यात हमखास पर्जन्याचा महिना म्हणून बघितल्या जातो. वास्तविक या महिन्यातच जिल्ह्यात तुलनेने अधिक पाऊस पडला आहे. मात्र प्रकल्प भरतील अशा पद्धतीने हा पाऊस झालेला नाही. त्यामुळे एकीकडे खरीप हंगामात पीक कर्जासाठी शेतकरी संघर्ष करीत असतानाच रब्बीतील पाण्याच्या आवर्तनाचे कसे असा दुहेरी प्रश्न शेतकर्यांना पडला आहे. बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ६६७.८ मिमी पावसाची नोंद होत असते. त्या तुलनेत २९ जुलैपर्यंत जिल्ह्यात केवळ ३७.५० टक्के (२५०.४ मिमी) सरासरी पाऊस पडला. जो की गतवर्षी ३२६.३ मिमी पडला होता. ज्याची टक्केवारी ही ४८.९२ टक्के होती. तुलना करता गतवर्षीपेक्षा जिलह्यात पावसाची तुट ही ११.४२ टक्के असल्याचे जाणवते. त्यामुळे गेल्यावर्षी खरीपातील पैसेवारी व दुष्काळासंदर्भातील नवीन निकष पाहता घाटाखालील ६६२ पेक्षा अधिक गावांमध्ये दुष्काळी स्थिती होती. नंतर तसा तो जाहीरही करण्यात आला होता. यावर्षी आतापर्यंतची स्थिती पाहता घाटाखालील तालुक्यांमध्ये वार्षिक सरासरीच्या तुलनेत गतवर्षी पेक्षा कमी पाऊस पडल्याचे जाणवत आहे. दम्यान, संग्रामपुर तालुक्यात जवळास सराससरीच्या बरोबरीत पाऊस पडल्याचे आकडे सांगतात. मात्र असे असले तरी जिल्ह्यातील काही भागात मात्र पावसाचे प्रमाण हे नगण्य असल्याची ओरड आहे. जिल्ह्यातील पावसाचे दिवसही कमी झाले असून आता ४५ ते ४६ दिवसच पावसाळ््यात पाऊस पडतो. सोबतच पावसाळ््यादरम्यान ओढ देण्याच्या त्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. नांदुरा तालुक्यात सर्वाधिक तुट घाटाखालील नांदुरा तालुक्यात २९ जुलैच्या तारखेत सर्वाधिक अशी ३२.६२ टक्के पावसाची तूट आहे. मलकापूरमध्ये ती २३.०७, जळगाव जामोद तालुक्यात २१.६७ टक्के, बुलडाणा तालुक्यात १७.७९ टक्के तर लोणार तालुक्यात १६.८४ टक्के तुट असल्याचे महसूल विभागाकडून प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

Web Title: Buldhana district receives 11% less rain than last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.