बुलडाणा : पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा सुरू करण्यासाठी घेराव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 01:32 AM2018-03-25T01:32:48+5:302018-03-25T01:32:48+5:30

बुलडाणा: वीज पुरवठ्याचे बिल गेल्या चार वर्षांपासून न भरल्या गेल्यामुळे मोताळा तालुक्यातील राजूर रोहिणखेड बारा गाव प्रादेशिक पाणी पुरवठा या योजनद्वारे करण्यात आलेल्या बारा गावांना पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. याबाबत लोकनेते विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात रोहिणखेडसह १२ गावाचे ग्रामस्थांनी महावितरण कंपनीचे अधीक्षक कडाळे यांना शुक्रवारी घेराव घातला. यावेळी चर्चेअंती चालू बिल भरून बारा गाव पाणी पुरवठा योजनाचा विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला.

Buldana: Girdha to start supply of electricity to the water supply scheme! | बुलडाणा : पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा सुरू करण्यासाठी घेराव!

बुलडाणा : पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा सुरू करण्यासाठी घेराव!

Next
ठळक मुद्देविजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात रोहिणखेड परिसरातील ग्रामस्थांचे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: वीज पुरवठ्याचे बिल गेल्या चार वर्षांपासून न भरल्या गेल्यामुळे मोताळा तालुक्यातील राजूर रोहिणखेड बारा गाव प्रादेशिक पाणी पुरवठा या योजनद्वारे करण्यात आलेल्या बारा गावांना पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता. याबाबत लोकनेते विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात रोहिणखेडसह १२ गावाचे ग्रामस्थांनी महावितरण कंपनीचे अधीक्षक कडाळे यांना शुक्रवारी घेराव घातला. यावेळी चर्चेअंती चालू बिल भरून बारा गाव पाणी पुरवठा योजनाचा विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला.
या योजनेत मोताळा तालुक्यातील राजूर, रोहिणखेड, टाकळी, वाघजाळ, काबरखेड, हनवतखेड, तपोवन, काळेगाव, पोखरी, फर्दापूर या दुष्काळग्रस्त गावांचा समावेश असून, आता उन्हाळा सुरू झाल्याने पाण्याची समस्या भयावह आहे. सदर बारा गावच्या सरपंचांनी वीज पुरवठा सुरू करण्यासाठी सतत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही वीज पुरवठा सुरू झाला नाही. ही समस्या लक्षात घेता विजयराज शिंदे यांनी बारा गावच्या सरपंच व प्रतिनिधी समवेत महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता कडाळे यांच्या कार्यालयात कडाळे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरनचे कार्यकारी अभियंता रबडे यांना घेराव घालून या संबंधी जाब विचारला. सविस्तर चर्चा करून सदर वीज बिल चा भरणा करण्याची गरज असल्याने तात्पुरता चालू वीज बिल भरणा ग्रामपंचायतीने करावा व उर्वरित भरणा म.जी.प्रा.ने शासनाकडे प्राधान्याने पाठपुरावा करून त्वरित करावा, अशा प्रकाराच्या यशस्वी तोडगा काढला. यावर सहमती दर्शवत अधीक्षक अभियंता यांनी चालू वीज बिलाचा भरणा ग्रामपंचायतींकडून करून घेऊन वीज कनेक्शन  तात्काळ सुरू करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता यांना दिल्या. याची फलश्रुती म्हणजे पुढील २४ तासात हे वीज कनेक्शन तात्काळ सुरू करण्यात आले. यावेळी विजयराज शिंदे यांच्यासह त्यांच्या समवेत बारा गावचे सरपंच, माधव शिराळ, दिगंबर पवार, राजू पाटील, दिलीप पाटील, सोपान खोटाडे, दादाराव पाटील, ईश्वर शिंदे व इतर ग्रामस्थ तथा ओमसिंग राजपूत, राजू गायकवाड, उद्धव भोंडे, अविनाश शेंडे आदी उपस्थित होते.

Web Title: Buldana: Girdha to start supply of electricity to the water supply scheme!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.