आषाढी एकादशी : हजारो भाविक शेगावात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 03:06 PM2018-07-22T15:06:34+5:302018-07-22T15:09:22+5:30

सोमवारी आषाढी एकादशी असल्याने भाविकांची पाऊले शेगावकडे वळत असून रविवारी शेगाव शहर  भाविकांनी गजबजून गेले.

Ashadhi Ekadashi: Thousands of pilgrims enter the shegaon | आषाढी एकादशी : हजारो भाविक शेगावात दाखल

आषाढी एकादशी : हजारो भाविक शेगावात दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देपंढरपूरला जाऊ शकत नाहीत, असे लाखो भाविक  आषाढ शु.११ देवशयनी आषाढी एकादशीला शेगाव येथे संत गजानन महाराजांचे दर्शन घेवून धन्य होतात.   आषाढी एकादशी सोमवारी असली, तरी रविवारपासूनच भाविकांनी संतनगरी शेगावात गर्दी केली आहे.  हरिनाम तसेच गजानन महाराजांच्या  जयघोषाने संतनगरी दुमदुमली आहे.

- गजानन कलोरे    
शेगाव : विदर्भाची  पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. जे भाविक पंढरपूरला जाऊ शकले नाहीत, असे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात. सोमवारी आषाढी एकादशी असल्याने भाविकांची पाऊले शेगावकडे वळत असून रविवारी शेगाव शहर  भाविकांनी गजबजून गेले.
सोमवारी आषाढी एकादशी असल्याने शेगावात महोत्सव पाहाय मिळेल.  या महोत्सवानिमित्त अनेक भाविक पंढपूरला गेले आहेत. परंतु जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, असे लाखो भाविक  आषाढ शु.११ देवशयनी आषाढी एकादशीला शेगाव येथे संत गजानन महाराजांचे दर्शन घेवून धन्य होतात.  
आषाढी एकादशी निमित्त सोमवार दुपारी २ वाजता श्रींची पालखी हरिनामाच्या गजरात नगरपरिक्रमेला निघेल. श्रींची पालखी श्री दत्त मंदिर, श्री हरहर मंदिर, श्री शितलनाथ महाराज संस्थान, सावित्रीबाई फुले महिला पतसंस्थेसमोरुन श्रींचे प्रगटस्थळ, श्री मारोती मंदिर, श्री गोरोबा काका मंदिर, लायब्ररी, प्राचीन शिवमंदिर, मातीची गढी, आठवडी बाजार चौक, बसस्थानक, व्यापारपेठ, गांधी चौक, लहुजी वस्ताद चौक या मार्गाने फिरून मंदिरात परत येईल. येथे पूजाअर्चा, आरती होवून आषाढी एकादशी यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे. पंढरपूर येथे शेगाव संस्थानच्या शाखांमध्ये सुध्दा आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात येत आहे. संतनगरीत श्रींचे भक्त, वारकºयांसाठी फराळाची व्यवस्था करतात. श्री लहुजी उस्ताद चौकात श्री भक्त मंडळ व संत गजानन महाराज न्यु मार्केट  यांच्यावतीने भक्तांना, वारकºयांना फराळी खिचडी, उसळचे वाटप करण्यात येते. दरम्यान आषाढी एकादशी सोमवारी असली, तरी रविवारपासूनच भाविकांनी संतनगरी शेगावात गर्दी केली आहे.  हरिनाम तसेच गजानन महाराजांच्या  जयघोषाने संतनगरी दुमदुमली आहे.

Web Title: Ashadhi Ekadashi: Thousands of pilgrims enter the shegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.