गृह राज्यमंत्र्यांच्या दबावामुळे अकोला जिल्हा परिषदेतील अधिकार्‍याची स्वेच्छानवृत्ती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:14 AM2018-02-15T00:14:45+5:302018-02-15T01:57:29+5:30

अकोला : राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी  सर्वांसमक्ष पाणउतारा करत एखाद्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी  सुभाष पवार यांनी स्वेच्छा नवृत्तीसाठी सरकारकडे अर्ज केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, डॉ. पाटील यांनी हे आरोप  फेटाळले आहेत. 

Acceptance of Akola Zilla Parishad officer due to pressure from home minister! | गृह राज्यमंत्र्यांच्या दबावामुळे अकोला जिल्हा परिषदेतील अधिकार्‍याची स्वेच्छानवृत्ती!

गृह राज्यमंत्र्यांच्या दबावामुळे अकोला जिल्हा परिषदेतील अधिकार्‍याची स्वेच्छानवृत्ती!

Next
ठळक मुद्देअकोला जिल्हा परिषदेतील प्रकारसरकारकडे केला थेट अर्जमंत्र्यांनी मात्र आरोप फेटाळले! 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी  सर्वांसमक्ष पाणउतारा करत एखाद्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिल्याचा आरोप करत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी 
सुभाष पवार यांनी स्वेच्छा नवृत्तीसाठी सरकारकडे अर्ज केल्याने खळबळ उडाली आहे. मात्र, डॉ. पाटील यांनी हे आरोप  फेटाळले आहेत. 
१२ फेब्रुवारी रोजी झालेल्या जनता दरबारामध्ये  गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने काढलेली निविदा मंजूर करण्यासाठी  आपल्यावर दबाव आणला. तसेच, अशा प्रकारे निविदा मंजूर करणे नियमबाहय़ असल्याचे आपण  निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी अतिशय अपमानास्पद व असंसदीय भाषा वापरून आपला अपमान केला. एवढेच नाही, तर एखाद्या प्रकरणात अडकविण्याची धमकी दिल्याचा गंभीर आणल्याचा आरोप जि.प.चे अति. कार्यकारी अधिकारी सुभाष पवार यांनी केला आहे. याबाबत त्यांनी ग्रामविकास व जलसंधारण खात्याच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून स्वेच्छा नवृत्ती घेत असल्याचे कळविले आहे.  

अकोला जिल्हा परिषदेच्या संदर्भातील तक्रारींचा निपटारा होण्याचे काम अतिशय कमी आहे. त्यामुळे निर्देशांचे अनुपालन का होत नाही, याबाबत अधिकार्‍यांना जाब विचारला. नाराजी व्यक्त केली. हे सर्व जिल्हाधिकारी व इतर अधिकार्‍यांच्या समक्ष घडले आहे.  त्यामुळे सुभाष पवार यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. 
- डॉ. रणजित पाटील, गृहराज्यमंत्री.

Web Title: Acceptance of Akola Zilla Parishad officer due to pressure from home minister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.