जिल्हा नियोजन समितीसाठी ९७.२३ टक्के मतदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 01:17 AM2017-08-09T01:17:09+5:302017-08-09T01:17:32+5:30

बुलडाणा :  जिल्हा नियोजन समिती निवडणूक २0१७ साठी ८ ऑगस्ट २0१७ रोजी मतदान पार पडले.जिल्ह्यात एकूण ९७.२३ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व उत्साहात मतदान झाले. या निवडणुकीसाठी १४ मतदान केंद्रांची व्यवस्था होती. त्यामध्ये बुलडाणा तहसील कार्यालयात दोन मतदान केंद्र होती. त्यापैकी एक जिल्हा परिषद सदस्य मतदारांकरिता, तर एक नगर परिषद सदस्य मतदारांकरिता होते. संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयात नगर परिषद सदस्य   मतदारांकरिता  मतदान केंद्राची व्यवस्था होती. 

9 7.23 percent polling for District Planning Committee | जिल्हा नियोजन समितीसाठी ९७.२३ टक्के मतदान 

जिल्हा नियोजन समितीसाठी ९७.२३ टक्के मतदान 

Next
ठळक मुद्दे३६१ मतदार, स्त्री मतदार २0४ व पुरूष १५७ मतदार१४ मतदान केंद्रांवर पार पडले मतदान शिवसेनेचे सहा सदस्य अविरोध 

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  जिल्हा नियोजन समिती निवडणूक २0१७ साठी ८ ऑगस्ट २0१७ रोजी मतदान पार पडले.जिल्ह्यात एकूण ९७.२३ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.
जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व उत्साहात मतदान झाले. या निवडणुकीसाठी १४ मतदान केंद्रांची व्यवस्था होती. त्यामध्ये बुलडाणा तहसील कार्यालयात दोन मतदान केंद्र होती. त्यापैकी एक जिल्हा परिषद सदस्य मतदारांकरिता, तर एक नगर परिषद सदस्य मतदारांकरिता होते. संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयात नगर परिषद सदस्य   मतदारांकरिता  मतदान केंद्राची व्यवस्था होती. 
  या निवडणुकीकरिता स्त्री २0४ व पुरूष १५७ मतदार होते. अशाप्रकारे एकूण मतदारसंख्या ३६१ होती. त्यापैकी बुलडाणा (नागरी), चिखली, दे.राजा, सिं.राजा, लोणार, मेहकर, खामगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद, नांदुरा, मोताळा व मलकापूर मतदान केंद्रावर १00 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली; मात्र मोताळा ९४.१२, शेगाव ९६.३0 व बुलडाणा (ग्रामीण) येथे ८६.६0 मतदानाची नोंद करण्यात आली.
जिल्ह्यातील बुलडाणा (ग्रामीण)  मतदान केंद्रावर स्त्री- २९, पुरूष २३, बुलडाणा (नागरी) : स्त्री १८ व पुरूष ११, चिखली : स्त्री १४ व पुरूष १३, दे.राजा : स्त्री १२ व पुरूष ७, सिं.राजा : स्त्री १0 व पुरूष ७, लोणार : स्त्री ९ व पुरूष ८, मेहकर : स्त्री १३ व पुरूष १२, खामगाव : स्त्री १८ व पुरूष १६, संग्रामपूर : स्त्री ९ व पुरूष ८, जळगाव जामोद : स्त्री १0 व पुरूष ९, नांदुरा : स्त्री १५ व पुरूष ९, मलकापूर : स्त्री १४ व पुरूष १५, मोताळा : स्त्री १0 व पुरूष ६,  शेगांव : स्त्री १५ व पुरूष ११ मतदारांनी मतदान केले. निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे सर्वांना उत्सुकता लागून आहे. 

शिवसेनेचे सहा  सदस्य अविरोध 
जिल्ह्याच्या विकासात्मक बाबीवर आढावा घेऊन उपाययोजना आखणार्‍या जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचे सहा सदस्य अविरोध निवडून आल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख जालींधर बुधवत यांनी दिली. या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्यांमधून शिवसेनेच्या ४ जागा तर न.प.च्या नागरी भागामधून २ जागा अविरोध निवडून आल्या आहेत. यामध्ये जि.प.मधून सर्वसाधारण महिला प्रवर्गातून कमलाताई जालींधर बुधवत, सर्वसाधारणमधून शरद दत्तात्रय हाडे, अनुसूचित जातीमधून शीलाताई धनशीराम शिंपणे, ना.मा.प्र.महिलामधून रेणुका दिलीप वाघ या तसेच न.पा.च्या ना.मा.प्र. मधून नंदन अशोक खेडेकर व ना.मा.प्र. महिलामधून पुष्पाताई शिवाजीराव धुड यांची अविरोध निवड झाली आहे. 

Web Title: 9 7.23 percent polling for District Planning Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.