स्कूल बसच्या फेर तपासणीला ३१ मेची डेडलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 03:31 PM2019-05-04T15:31:12+5:302019-05-04T15:31:15+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात सुरू असलेल्या स्कूल बसची आरटीओकडून होणाऱ्या फेरतपासणीसाठी ३१ मे ची डेडलाईन देण्यात आली आहे.

31 deadline deadline for review of school bus | स्कूल बसच्या फेर तपासणीला ३१ मेची डेडलाईन

स्कूल बसच्या फेर तपासणीला ३१ मेची डेडलाईन

Next


बुलडाणा : जिल्ह्यात सुरू असलेल्या स्कूल बसची आरटीओकडून होणाऱ्या फेरतपासणीसाठी ३१ मे ची डेडलाईन देण्यात आली आहे. मुदतीमध्ये तापसणी न केल्यास संबंधीत वाहनाचा परवाना निलंबित होऊ शकते.
नागपूर उच्च न्यायालयाने ७ एप्रिल २०१६ रोजी दिलेल्या आदेशानुसार स्कुल बस म्हणून नोंदणी झालेल्या वाहनांना कार्यालयात फेरतपासणी करीता बोलावून त्या स्कुल बस नियमावली २०११ च्या नुसार सुरक्षाविषयक तरतूदीचे काटेकारपणे पालन करतात किंवा कसे याबाबत तपासणी करण्यात येते. त्यासाठी स्कूल बस उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात किंवा शिबीरामध्ये प्रपत्र अनुसार ३१ मे २०१९ पूर्वी हजर करुन स्कूल बसेसची फेर तपासणी करुन घ्यावी व तसा अहवाल प्राप्त करून घ्यावा, असे आदेश उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिले आहेत. स्कूल बसची फेर तपासणी न केल्यास वाहनाच्या परवान्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात येणार असून, वाहन स्त्यावर आढळल्यास जप्त करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व स्कुल बस मालकांनी आपल्या वाहनांची फेरतपासणी दिलेल्या मुदतीत करुन घ्यावी व तसा तपासणी अहवाल प्राप्त करुन घेण्यात यावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: 31 deadline deadline for review of school bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.