ग्रंथालय अनुदानासाठी १२५ कोटींची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 05:06 AM2018-07-15T05:06:16+5:302018-07-15T05:06:26+5:30

राज्यात सुरू असलेल्या १२ हजार १४८ ग्रंथालयाच्या नियमित अनुदानासाठी १२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्य ग्रंथालय संचालक सु.ही. राठोड यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

125 crore provision for library grant | ग्रंथालय अनुदानासाठी १२५ कोटींची तरतूद

ग्रंथालय अनुदानासाठी १२५ कोटींची तरतूद

Next

बुलडाणा : राज्यात सुरू असलेल्या १२ हजार १४८ ग्रंथालयाच्या नियमित अनुदानासाठी १२५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्य ग्रंथालय संचालक सु.ही. राठोड यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
महागाई विचारात घेत शासनमान्य सार्वजनिक गं्रथालयांच्या अनुदानात २००४-०५ पर्यंत दुप्पट वाढ करण्यात आली. २०१२-१३ मध्ये २००४-०५ च्या अनुदान दराच्या ५० टक्के अनुदान वाढ झाली. सार्वजनिक गं्रथालयाच्या परिरक्षण अनुदानात आतापर्यंत सहा वेळा वाढ करण्यात आली आहे. नियमित परीरक्षण अनुदानाव्यतिरिक्त राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र यांच्या निधीतून अनेक योजना राबविण्यात येतात. २०१८-१९ या वर्षासाठी सहायक अनुदान या बाबीसाठी राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या नियमित अनुदानासाठी १२५ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.

Web Title: 125 crore provision for library grant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा