डोणगाव येथे २५ एकरात लावणार १0 हजार वृक्ष

By admin | Published: July 1, 2016 12:24 AM2016-07-01T00:24:27+5:302016-07-01T00:24:27+5:30

बुलडाणा वाशिम जिल्ह्याच्या सीमेवरील पिंप्री या गावात एकाच दिवशी लागणार १0 हजार वृक्ष.

10 thousand trees to be planted in 25 acres of land at Donegaon | डोणगाव येथे २५ एकरात लावणार १0 हजार वृक्ष

डोणगाव येथे २५ एकरात लावणार १0 हजार वृक्ष

Next

डोणगाव (जि. बुलडाणा) : डोणगावपासून ५ कि.मी.अंतरावर बुलडाणा वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर असणार्‍या पिंप्री या ग्रामपंचायतने १ जुलैला एकाच दिवशी १0 हजार वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे. पिंप्री सरहद हे गाव वाशिम जिल्ह्यातील शेवटचे गाव व बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर असणारे गाव आहे. सरपंच किरण गाभणे यांनी गावाची सभा बोलावून गावात असलेल्या २५ एकर ई-क्लास जमिनीवर प्रत्येकाने तीन वृक्ष लावायचे, असा संकल्प केला. यावर सर्व सदस्य व गावकर्‍यांनी सहमती दर्शविली व आ.अमित झनक यांच्या हस्ते व अधिकार्‍यांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड एकाच वेळी करण्यात येणार आहे.

Web Title: 10 thousand trees to be planted in 25 acres of land at Donegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.