...स्मार्ट टीव्ही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 11:56 PM2019-01-29T23:56:36+5:302019-01-29T23:57:04+5:30

टीव्ही आणि कॉम्प्युटर ही दोन्ही गॅजेट्स एकरूप होऊन आकर्षक स्मार्ट टीव्ही तयार झाला आहे. स्मार्ट टीव्ही वायफाय किंवा एथरनेट केबलद्वारे इंटरनेटशी जोडला जातो.

... smart tv | ...स्मार्ट टीव्ही

...स्मार्ट टीव्ही

Next

- शिल्पा मोहिते

टीव्ही आणि कॉम्प्युटर ही दोन्ही गॅजेट्स एकरूप होऊन आकर्षक स्मार्ट टीव्ही तयार झाला आहे. स्मार्ट टीव्ही वायफाय किंवा एथरनेट केबलद्वारे इंटरनेटशी जोडला जातो. या टीव्हीमध्ये कॉम्प्युटरप्रमाणे एक सीपीयू असतो, जो इंटरनेटवरील डेटा टीव्हीवर स्ट्रीम करू शकतो. ब्राऊसरच्या सेवेमुळे लॅपटॉपवरून होणारे काम टीव्हीच्या माध्यमातून होऊ शकते. मोबाइल गेम्स स्ट्रीम होऊ शकतात. काही स्मार्ट टीव्हीचे रिमोटही स्मार्टफोनवर उपलब्ध होतात. अर्थात साध्या टीव्हीपेक्षा स्मार्ट टीव्हीची किंमत जास्त असते. परंतु साध्या टीव्हीला स्ट्रिमिंग डिवायसेस जोडून आपला टीव्ही थोडा तरी स्मार्ट करू शकतो.

तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जग अधिकाधिक छोटे आणि कॉम्पॅक्ट झाले आहे. याचे उत्तम उदाहरण तुमच्या घरातला एकेकाळी इडियट बॉक्स म्हणावला जाणारा ओबडधोबड टीव्ही आणि बरीच जागा व्यापणारा कॉम्प्युटर. मात्र ही दोन्ही गॅजेट्स एकरूप होऊन आकर्षक स्मार्ट टीव्ही तयार झाला आहे. तुमच्या दिवाणखान्यात ऐटीने विराजमान होऊ पाहणाऱ्या या स्मार्ट टीव्हीची थोडी ओळख करून घेऊ.

‘पिक्चर क्लियर आहे का... नाही अजून, अ‍ॅन्टेना फिरव’ अशा हाका आता शेजारच्या घरातून ऐकू येत नाहीत. ते अ‍ॅन्टेना जाऊन केबल टीव्ही आले आणि तेही इतिहासात जमा होऊन घरोघरी डिजिटल सेट टॉप बॉक्स आले. पण या बरोबरीने वाढत होते एक समांतर विश्व, सोशल मीडिया. सोशल मीडियामुळे लोकांना व्यक्त होण्यासाठी विशाल व्यासपीठ मिळाले आणि प्रचंड प्रमाणात वेब कन्टेंट मिळू लागला. सेट टॉप बॉक्स अजूनही वापरात असले, तरी हळूहळू प्रेक्षक इंटरनेटकडे वळू लागला आहे. प्रचलित वाहिन्यांनासुद्धा इंटरनेटवर आपली शाखा उघडणे भाग पडले आहे. स्मार्ट टीव्ही हा सगळा वेब कन्टेंट तुमच्यापर्यंत सहज आणि स्वस्तात पोहोचवतो.

यू-ट्यूब व्यतिरिक्त फेसबुक, टिष्ट्वटर इत्यादी माध्यमांचा आनंदसुद्धा स्मार्ट टीव्हीच्या मोठ्या पडद्यावर घेता येतो. बºयाच स्मार्ट टीव्हीना ब्राऊसरची सेवासुद्धा उपलब्ध असल्याने, बरेचसे काम जे तुम्ही लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर करता ते तुम्ही तुमच्या सोफ्यावर बसून आरामात या टीव्हीच्या माध्यमातून करू शकता.

बºयाच स्मार्ट टीव्हीमध्ये व्हिडीयो गेम्स खेळता येतात. मात्र टीव्ही रिमोट फक्त सध्या सोप्या गेम्स्पर्यंतच नीट चालतो. पण यासाठी पर्याय उपलब्ध आहे तो मिररिंगचा. बहुतांश सगळ्या स्मार्ट टीव्हीमध्ये असलेल्या मिररिंगच्या सोयीमुळे तुमच्या स्मार्टफोनची स्क्र ीन टीव्हीवर पाहू शकता. मिररिंगमुळे मोबाइलमधील गेम्ससुद्धा टीव्हीवर स्ट्रीम करता येतात आणि मोबाइल नियंत्रकासारखा वापरता येतो. काही स्मार्ट टीव्हीच्या पॅनेलवर कॅमेरा बसवलेला असतो, ज्यामुळे व्हिडीयो कॉलिंगच्या सुविधेचा वापरदेखील विनासायास मोठ्या स्क्रीनवरून करता येतो.

बºयाच स्मार्ट टीव्हीचे रिमोटसुद्धा स्मार्ट असतात. रिमोटमधील माइकमुळे, टीव्ही तुमचा आवाज ऐकून चॅनेल बदलू शकतो. मोशन सेन्सरच्या सहायाने बºयाच स्मार्ट टीव्हीमधे जेस्चर कंट्रोल शक्य होते. म्हणजे कुठलेही रिमोट न वापरता हाताने टीव्हीवरचे पर्याय निवडता येतात. तर काही स्मार्ट टीव्ही रिमोट तुमच्या स्मार्टफोनवर उपलब्ध करून देतात. म्हणजे आता रोज रिमोट कुठे ठेवला ते शोधायची गरज नाही. स्मार्ट टीव्हीचे कितीही फायदे असले तरी त्याची किंमत साध्या टीव्हीपेक्षा अंमळ जास्त असते. स्मार्ट टीव्ही तुमच्या बजेटमध्ये बसत नसेल तरी साध्या टीव्हीला स्मार्ट बनवता येऊ शकते. बाजारात वेगवेगळ्या ब्रॅण्डसचे स्ट्रिमिंग डिवायसेस उपलब्ध आहेत. स्ट्रिमिंग डिवाइस वायफायद्वारे इंटरनेटला कनेक्ट होतो आणि टीव्हीला स्ट्रिमिंग डाटा पुरवातो. हा छोटासा डबा, साध्या टीव्हीला पूर्ण नाही पण थोडा तरी स्मार्ट बनवू शकतो.

(लेखिका टेक्नोक्रॅट आहेत.)
 

Web Title: ... smart tv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.