When will the loyalty measure of loyalty be given? | निष्ठावंतांच्या निष्ठेला झुकते माप कधी मिळेल
निष्ठावंतांच्या निष्ठेला झुकते माप कधी मिळेल

 - देवेंद्र पाठक

महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्षाची वाटचाल राहणार असल्याचे पदाधिकाºयांना विसरुन चालणार नाही़ निष्ठावंतांची नाराजी ओळखून ती वेळीच दूर करायला हवी़ ती होत नसल्यामुळे त्याचा फटका येणाºया निवडणुकीत कमी-अधिक प्रमाणात पक्षीय पातळीवर सहन करावा लागेल, याची देखील मानसिकता स्थानिक पदाधिकाºयांनी बाळगावी़ काँग्रेसकडे महानगर पालिका निवडणुकीत उमेदवारी करणाºयां इच्छुकांची मागणी मागील निवडणुकीच्या तुलनेत समाधानकारक होती़ त्याला कारण देखील तसेच होते़ महापालिका हद्दीत समाविष्ठ झालेल्या गावांमध्ये आजही काँग्रेसचे प्राबल्य आहे़ त्याचा फायदा हा साहजिकच पक्षाला मिळेल, त्यामुळेच अनेक इच्छूकांनी काँगे्रसकडे उमेदवारीसाठी धाव घेतली़ ही संख्या समाधानकारक असल्यामुळे त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला़ त्यात विद्यमान पदाधिकाºयांनी देखील उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली़ 
यात नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांचे म्हणणे पक्ष निरीक्षकांनी ऐकून घेतले़ त्यानंतर स्थानिक पदाधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर उमेदवारी कोणाला द्यायची यावर बºयाच काथ्याकूट झाला़ उमेदवारी देण्याचा साधा विषय देखील राज्य पातळीवर चर्चिला गेला़ यात काय आणि किती प्रमाणात शिजले हे पुरेशा प्रमाणात बाहेर आले नसलेतरी उमेदवारी देत असताना मात्र त्याचे प्रतिबिंब चांगलेच उमटले़ नव्याना संधी देत असताना जुन्यांना मात्र सर्रासपणे बाजुला टाकले गेल्याचा आरोप देखील करण्यात आला़ 
संबंधितांची उमेदवारी नाकारत असताना ठोस कारण देखील पदाधिकाºयांना देता आलेले नाही़ यावरुन किती आणि कोणत्या प्रमाणात निर्णय घेण्यात आले असावे, हे स्पष्ट होत आहे़ जे कार्यकर्ते इतक्या वर्षापासून एकनिष्ठेने आपल्याकडे आहेत, त्यांच्या असण्यावरच पक्ष मजबुतीने उभा आहे, त्यांनाच डावलण्यात येणार असेल तर निष्ठावंतांची निष्ठा नक्कीच समोर आल्यावाचून राहणार नाही़ ज्यांना पक्ष काय, पक्षाचे धोरण काय, पक्षाबद्दल असलेली आपुलकी जिव्हाळा माहित नाही त्यांना झुकते माप मिळणार असेल तर एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी ही उमटणारच़ यावर कोणीही बोलायला तयार नाही़  
पक्ष वाढविणे हे एकमेव ध्येय मनाशी बाळगत असताना त्याला कुठूनतरी सुरुंग लागत आहे याकडे देखील बघणे गरजेचे आहे़ कार्यकर्त्यांची ताकद, त्यांचे असलेले प्रभागातील हितसंबंध यावरुनच प्रभागातील नगरसेवकाचा विजय मानला जातो़ उमेदवाराचा खरा प्रचार हा मतदारांपर्यंत जातो का, हे देखील महत्वाचे आहे़ त्यात पुन्हा कार्यकर्त्यांची एकनिष्ठा, पक्षाबद्दल असलेले प्रेम समोर येते़ या बाबी लहान वाटत असल्यातरी दुरगामी परिणाम करणाºया ठरु शकतात़ होऊ घातलेली महानगरपालिकेची निवडणूक ही आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीची रंगीत तालिम आहे़ पक्षीय पातळीवर जोर लावत असताना आपली ताकद किती हे दाखविण्याचा सराव आता सर्वांनीच सुरु केलेला आहे़ 
कार्यकर्त्यांचा विश्वास संपादन करणे, त्यांना महत्वाची पदे बहाल करत असताना त्यांची नाराजी ओळखून ती वेळीच दूर करणे गरजेचे आहे़ कार्यकर्त्यांना पक्ष बदलण्याची वेळ का येते, आजवर त्यांनी केलेल्या कामांचे मुल्यमापन कधी होणार, त्यांची पक्षाबद्दल असलेली आपुलकी कधी प्रदर्शित होणार, हे देखील वेळोवेळी तपासायला हवे़ ते होत नसल्यामुळे आणि नव्याने येणाºया कार्यकर्त्याला झुकते माप मिळणार असेल तर निष्ठावंतांची निष्ठा भविष्यात विचार करणारी असेल, हे निश्चित!
चुरशीच्या ठरणाºया निवडणुकीत काँग्रेस आणि राष्टÑवादी सोबत आहे. गेल्यावेळेस दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. यंदा आघाडी असल्याने त्याचा लाभ काँग्रेसला मिळणार का, गेल्यावेळेच्या तुलनेत यंदा जास्त जागा पक्षाला मिळतील का, याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.


Web Title: When will the loyalty measure of loyalty be given?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.