निवडणुकीत वर्चस्व राखण्याची सेनेची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 11:54 AM2018-11-28T11:54:14+5:302018-11-28T11:56:07+5:30

शिवसेनेचे ४७ उमेदवार निवडणूक रिंगणात

Test series to dominate the elections | निवडणुकीत वर्चस्व राखण्याची सेनेची कसोटी

निवडणुकीत वर्चस्व राखण्याची सेनेची कसोटी

googlenewsNext

अतुल जोशी
धुळे-महानगरपालिका स्थापन झाल्यापासून आता ही चौथी निवडणूक होत आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन निवडणुकात शिवसेनेने भाजपाशी युती करूनच निवडणुका लढविल्या. मात्र यावेळी आपली ताकद, वर्चस्व दाखविण्यासाठी त्याचबरोबर आगामी काळात होणाºया निवडणुकीवर लक्ष ठेवून शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.  महापालिकेच्या निवडणुकीत वर्चस्व प्रस्तापित करण्यासाठी शिवसेनेची कसोटी लागणार आहे.
ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी आगामी काळात होणाºया निवडणुकीची रंगीत तालीम आहे. या निवडणुकीतील यशापयशावर पुढील समिकरणे अवलंबून असल्याने, प्रत्येक पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या निवडणुकीत स्वत:ला झोकून दिलेले आहे. 
२००३,२००८ व २०१३ मध्ये शिवसेनेने भाजपाशी युती करूनच निवडणूक लढविली होती. अर्थात सर्वात जास्त जागा शिवसेनेच्या वाट्यालाच आल्या होत्या. महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत घवघवीत यश मिळविणाºया शिवसेनेला उर्वरित दोन निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही हे वास्तव आहे. परंतु  तरी भाजपापेक्षा निश्चितच जास्त जागा मिळविल्या हे नाकारून चालणार नाही. महापालिकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला होता. शहरात पक्षाला किती समर्थन हे यानिवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत वर्चस्व मिळविण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. यात त्यांची कसोटी लागत आहे.   ७४ जागांच्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला अवघे ५० जागांवरच उमेदवार मिळाले होते. छाननीत तीन उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे निवडणूक रिंगणात केवळ ४७ उमेदवारच राहिलेले आहे. एवढ्या कमी जागांमध्ये सत्तेच्या सिंहासनापर्यंत कसे पोहचणार  हा खरा प्रश्न आहे. या कमी जागांमध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडणून आणण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाºयांना, कार्यकर्त्यांना दिवस-रात्र एक करावा लागणार आहे.
मनपाच्या निवडणूक रिंगणात थोडथोडके नव्हे तर ३५६ उमेदवार आहेत. बोटावर मोजण्याऐवढ प्रभाग सोडल्यास एकाच वॉर्डात तीन-चार उमेदवार असल्याने, मतांची विभागणी मोठ्या प्रमाणावर होणार आहे. अशा चुरशीच्या लढतीत, यश मिळविणे महादिव्य काम असून ते शिवसेनेचे उमेदवार कितपत साध्य करू शकतात हे लवकरच समजेल. मतदानासाठी आता अवघे १२ दिवस शिल्लक असून, प्रचार शिगेला पोहचलेला आहे. आघाडीचे नेते, भाजपाचे नेते प्रचारात उतरलेले असतांना शिवसेनेच्या उमेदवारांना स्वबळावरच प्रचाराचा रथ ओढावा लागतो आहे. जिल्ह्याला प्रथमच दादा भुसे यांच्या रूपाने शिवसेनेचे पालकमंत्री लाभलेले आहेत. मात्र ते अद्याप प्रचारासाठी आलेले नाहीत. त्याचबरोबर राज्यस्तरावरील दुसरा अन्य देताही अद्याप आलेला नाही.  असे असले तरी पक्षाच्या स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकाºयांनी प्रचारात सातत्य राखले  आहे. त्यांच्या या प्रयत्नांना किती यश मिळते, हे निकालानंतर स्पष्ट होईल. मात्र 

Web Title: Test series to dominate the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.