मित्राचा मॅसेज करु शकतो तुमची आर्थिक फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 12:23 AM2019-02-08T00:23:30+5:302019-02-08T00:23:53+5:30

सध्या नागरिकांच्या मोबाईलवर एका संदेशाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात एक हजार रुपये जमा केले आहे. लिंकवर संपर्क केल्यास पैसे मिळतील असा तो संदेश आहे. मात्र या संदेशाने अनेकांची फसवणूक केली असून त्यामुळे नागरिकांनी सावध राहणे गरजेची आहे.

You can send a friend's message to your financial fraud | मित्राचा मॅसेज करु शकतो तुमची आर्थिक फसवणूक

मित्राचा मॅसेज करु शकतो तुमची आर्थिक फसवणूक

Next
ठळक मुद्देनवा फंडा : लिंक शेअर करु नका, बँक डिटेल देऊ नका

संजय साठवणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : सध्या नागरिकांच्या मोबाईलवर एका संदेशाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात एक हजार रुपये जमा केले आहे. लिंकवर संपर्क केल्यास पैसे मिळतील असा तो संदेश आहे. मात्र या संदेशाने अनेकांची फसवणूक केली असून त्यामुळे नागरिकांनी सावध राहणे गरजेची आहे. अशी कोणतीही लिंक शेअर करु नका आणि बँक डिटेलही देऊन नका.
आॅनलाईन व्यवहारात आतापर्यंत शेकडो नागरिकांची फसवणुक झाली आहे. कोट्यवधीची लॉटरी लागल्याचा संदेश, एटीएम कार्ड बंद झाल्याचे सांगुन कार्ड व पीन नंबर विचारणे अशा प्रकारातून फसवणूक सुरु असतांना आता या सायबर गुन्हेगारांनी नवा फंडा शोधला आहे. तुमच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा तो संदेश असतो. गत काही दिवसांपासून अनोळखी नंबरवरुन मोबाईलवर संदेश येत आहे. तुमच्यासाठी एक हजार रुपये मित्राने एफवायएनडीमध्ये जमा केले आहे. त्यासाठी कोड एक्सओएमएमएफएल वापरा. पाठविलेली लिंक डाऊनलोड करा. असा संदेश असतो. अनेकजण अशा प्रलोभनाला बळी पडतात आणि आपली बँक खात्याची माहिती देवुन बसतात. या माध्यमातून तुमचा संपूर्ण डेटा सायबर गुन्हेगारापर्यंत पोहोचतो. या माहितीच्या आधारावर तुमच्या बँक खात्याचा पैसा काढण्यापर्यंत मजल जावू शकतो. त्यामुळे असे संदेश नजरअंदाज करणे गरजेचे आहे.
क्लीक केल्याचा परिणाम
मोबाईल येणाऱ्या संदेशाची लिंक क्लीक केल्यास अ‍ॅप्लीकेशन इंस्टॉल करण्यास सांगीतले जाते. नंतर परवानगी अलाऊ करण्यास सांगितले जाते ज्यामध्ये आपले संपर्क क्रमांक लोकेशन, फोटो स्टोरेज व अन्य माहिती या अ‍ॅप्लीकेशनच्या माध्यमातून डव्हलपरकडे सेव होते. त्या सर्व संपर्क क्रमांकावर हा संदेश जातो.
रहा सावध
आपल्या मोबाईलवर असे संदेश आले असतील तर या लिंक वर क्लीक करु नये. हा फिडींग संदेश आहे. क्लीक केल्यास आपल्या मोबाईलमधील माहिती सायबर गुन्हेगारापर्यंत जाऊ शकते. त्यातून आपली फसवणूक होऊ शकते. अनेकांच्या मोबाईलवर असे संदेश येत असून यासाठी सावध राहणे गरजेचे आहे.

Web Title: You can send a friend's message to your financial fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.