शेतात विद्युतपंप नाही, बिल मात्र हजारांचे

By Admin | Published: May 30, 2017 12:26 AM2017-05-30T00:26:32+5:302017-05-30T00:26:32+5:30

साधारणत: एखादी वस्तु घेतली किंवा उपभोग जर घेतला तर त्या वस्तुची किंमत मोजून देणे म्हणजे जबरदस्ती होत नाही.

There is no electric pump in the field, but billions of thousands only | शेतात विद्युतपंप नाही, बिल मात्र हजारांचे

शेतात विद्युतपंप नाही, बिल मात्र हजारांचे

googlenewsNext

शेतात मोटारपंपासाठी खांब उभे : वीज बंद, बिल येणे सुरु, कातूर्ली येथील प्रकार, मृत शेतकऱ्याच्या नावेही बील
विशाल रणदिवे। लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : साधारणत: एखादी वस्तु घेतली किंवा उपभोग जर घेतला तर त्या वस्तुची किंमत मोजून देणे म्हणजे जबरदस्ती होत नाही. परंतु वस्तु घेतली नाही किंवा उपभोगही घेतला नाही, फक्त त्या वस्तुची किंमत विचारले म्हणजे ती वस्तु घेतली असे होत नाही.
अड्याळ वरुण अवघ्या चार किलोमीटर अंतरावर कातुर्ली येथील रामनाथ वाहणे या नावाने विद्युत बिल येत आहे. ज्या नावाने बिल येत आहे ती व्यक्ती मृत पावली आहे. एक वर्षाआधी खांब गाडले गेले. तारा जोडल्या गेल्या, मिटर पेटी लावण्यात आली. परंतु वीज बंद. म्हणजे सर्व काही होऊन सुध्दा त्या शेतात वीज पोहचलीच नाही. आणि शेतातल्या विहिरीवर मोटारपंपही नाही, तरी सुध्दा विजेचे बील ३५ हजार १६० रुपयाचे हा कारभार कोणता असणार?
एका महितीनुसार शेतमालकाला पंचायत समितीमधून मोटार पंप मिळणार होते. परंतु दोन वर्षाचा कालावधी उलटून गेला पण मोटार पंप मिळाले नाही. त्याचप्रमाणे विशेष घटक योजनेंतर्गत गावातील तीन ते चार लाभार्थी होते की ज्यांना विहिर व मोटारपंप मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी रामनाथ वाहणे यांच्या शेतात विहिर तर बनली परंतु मोटारपंप गेली दोन वर्षापासून अजूनपर्यंत पोहचला नाही. हिच माहिती गाव आणि परिसरात पाण्यासारखी पसरली त्यामुळे असे प्रकरण पुन्हा उघडकीस येऊ शकतात. शेतकऱ्यांचे भले व्हावे म्हणून सरकार या नाही त्या योजना काढतो. परंतु येथील अधिकारीच शेतकऱ्यांची अशी गत करत असतील तर शेतकऱ्यांनी न्याय मागायचे कुणाकडे?
दोन वर्षापासुन पंप आले नाही वीज जोडली गेली नाही तरीसुध्दा बिल येणे सुरु आहे. याविषयी संबंधित विभागाला तोंडी बोलून सांगून झाले. परंतु बड्या अधिकाऱ्यांसमोर हा शेतकरी मात्र बोलुबोलुन थकुन गेला आहे. यावर्षी तरी मला मोझ्या हक्काचा मोटार पंप व वीज मिळेल अशी त्या शेतकऱ्यांची मागणी आहे.
परिसरातील लोकप्रतिनिधी याविषयीची चौकशी करणे गरजेचे आहे परंतु लोकप्रतिनिधीनाही सांगुन फायदा झाला नाही. येथील जिल्हा परिषद सदस्य तथा पंचायत समिती सदस्यांनी याविषयी लक्ष घालायला पाहिजे अशी मागणी ग्रामस्थ व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच विद्युत विभागाने सुध्दा असे प्रकरण पुन्हा होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

Web Title: There is no electric pump in the field, but billions of thousands only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.