ताई, रडायचं नाही, लढायचंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 01:14 AM2019-06-26T01:14:59+5:302019-06-26T01:15:24+5:30

नानांचे पाय सिरसोली ग्रामपंचायतच्या उंबरठ्यावर पडताच शिवलाल लिल्हारेच्या पत्नीने डोळ्यातून अश्रू ढाकले. हुंदके देत विस्कटलेल्या संसाराची वेदनादायी अवस्था कथन केली. यावेळी, नानांनी धीर देत, ताई तू रडायच नाही, आता लढायचं आहे, हा नाना पटोले तुमच्या पाठीशी आहे, अशी हिंमत देऊन तिची सांत्वना केली.

Tai, do not cry, fight | ताई, रडायचं नाही, लढायचंय

ताई, रडायचं नाही, लढायचंय

Next
ठळक मुद्देनाना पटोले : शिवलालच्या पत्नीला दिला धीर

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : नानांचे पाय सिरसोली ग्रामपंचायतच्या उंबरठ्यावर पडताच शिवलाल लिल्हारेच्या पत्नीने डोळ्यातून अश्रू ढाकले. हुंदके देत विस्कटलेल्या संसाराची वेदनादायी अवस्था कथन केली. यावेळी, नानांनी धीर देत, ताई तू रडायच नाही, आता लढायचं आहे, हा नाना पटोले तुमच्या पाठीशी आहे, अशी हिंमत देऊन तिची सांत्वना केली.
सिरसोलीच्या शिवलाल लिल्हारे यांचे उभ घरं पाडण्यात आले होते. शिवलालचा घर उध्वस्त केला. त्याच जागेवर प्रशासनाने घराचा पट्टा द्यावा या व इतर मागण्यांसाठी मोहाडी तहसिल कार्यालयावर जनाक्रोश मोर्चा काँग्रेसचे राष्ट्रीय नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वात काढण्यात आला होता. मोर्चा समापन झाल्यावर नाना पटोले यांनी सिरसोली गावाला भेट दिली.
शिवलालचे पडलेलं घर बघितले. कोणत्या कारणामुळे घर पाडले याची माहिती घेतली. घर पाडायची परिस्थिती नसताना घर पाडल्याची व शिवलालचे कुटुंब उघड्यावर आणल्याची प्रतिक्रिया लोकमतजवळ नाना पटोले यांनी व्यक्त केली. गावातील एका व्यक्तीनी तीन वर्षापासून कृषी पंपाला वीज जोडणी न मिळाल्याचे सांगितले. एका अपंग व्यक्तीचे शासनाकडून मिळणारा लाभ बंद करण्याची माहिती दिली, अशा बऱ्याच समस्या सिरसोली वासीयांनी कथन केल्या. शिवलालचे घर पाडल्यानंतर त्यांचे कुटुंब असुविधायुक्त ग्रामपंचायतच्या इमारतीत आश्रयीत झाली आहे. शिवलाल लिल्हारेची पत्नी सुनंदा एकटीच ग्रामपंचायतमध्ये बसली होती. नाना पटोले यांचे पाय ग्रामपंचायतच्या पायरीवर पडताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पदराने अश्रू पुसत तिचे हुंदके काळीज हेलावणारे होते. नानाची जमिनीवरच बसून आधी, ताई, तू आता रडू नकोस, तूला लढायच आहे. हा नाना तुझ्या व संपूर्ण परिवाराच्या पाठीशी आहे, असे बोलले. एक क्षण स्तब्धता होवून धीर गंभीर वातावरण निर्माण झालं होत.
आम्हाला खायला अन्न नाही, घालायला कपडे नाही, कुणीतरी आम्हाला डबा आणून देतो, हातचे जेवण माझ्या मुलांनी खाल्ले नाही, ते तिडके उपोषणावर बसली आहे, असे काळीजाला भिडणारे शब्द ऐकून नानांच मन पार हादरून गेल होत. नानांनी सुनंदा लिल्हारेंना धीर ठेवायच, हिंमतीने लढायच, मी तुमच्या पाठीशी असेन असे सांगून ग्रामपंचायतच्या दालनातून निघाले. यावेळी किसान नेते माधवराव बांते, राष्ट्रवादीचे नेते राजू कारेमोरे, काँग्रेसचे डॉ. पंकज कारेमोरे, किरण अतकरी, कमलाकर, निखाडे, डॉ. सुनील चवळे, नरेश ईश्वरकर, रमेश पारधी, आदी उपस्थित होते. गावातील जनतेची मोठ्या प्रमाणात नानांना बघण्यासाठी गर्दी जमी होती. मोठ्या प्रमाणावर पोलीस ताफाही होता.
उदारवाद व सहकार्य
उदारवादी व सहकार्य करण्याचा नाना पटोले यांचा स्वभाव सिरसोली येथेही दिसून आला. सुनंदा लिल्हारे यांना सिरसोली येथे व मोहाडी मधील उपोषण मंडपात शिवलाल लिल्हारे यांना आर्थिक मदत केली. उपोषण मंडळपात नाना पटोले यांनी शिवलालची भेट घेतली. रडून रडून शिवलालचे डोळे लालबंूद झाले होते. नानांनी रडणाऱ्या शिवलालचे अश्रू आपल्या दुपट्याने पूसून त्याला धीर दिला.

Web Title: Tai, do not cry, fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.