सहा वर्षीय चिमुकली सापडली नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2017 12:14 AM2017-06-13T00:14:59+5:302017-06-13T00:14:59+5:30

येथील घरासमोर खेळणारी एक सहा वर्षीय चिमुकली नागपूर बसस्थानक परिसरात सापडली.

Six-year-old Chimukali was found in Nagpur | सहा वर्षीय चिमुकली सापडली नागपुरात

सहा वर्षीय चिमुकली सापडली नागपुरात

Next

तुमसर येथील घटना : पोलीस पथक रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : येथील घरासमोर खेळणारी एक सहा वर्षीय चिमुकली नागपूर बसस्थानक परिसरात सापडली. सोमवारी ही घटना घडली. त्या चिमुकलीला कुणी नेले, ती कशी गेली, तिचे अपहरण तर झाले नाही ना? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहेत. चिमुकलीला आणण्याकरिता तुमसर येथील पोलीस पथक नागपूर येथे गेले आहे.
हसाराटोली श्रीरामनगर तुमसर येथे मुकेश माणिकलाल गेडाम यांचे घर आहे. सोमवारी सकाळी गेडाम कुटूंबिय नेहमीप्रमाणे जागे झाले. लहान मूलगी माई मुकेश गेडाम (६) घरासमोर खेळायला गेली. बराच वेळ ती परत न आल्याने आई-वडीलांनी शोधाशोध केली. शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता माई तिथे नव्हती घाबरलेल्या गेडाम कुटूंबीयांनी तुमसर पोलिसात धाव घेतली. तुमसर पोलिसांनी तात्काळ दखल घेत तपासाची चक्रे फिरविली.
दूपारी १.४६ मिनीटांनी तुमसर पोलीस ठाण्यात गणेशपेठ, नागपूर पोलीस ठाण्यातून दूरध्वनीवर चिमुकली माईबद्दल विचारणा करण्यात आली. बसस्थानक परिसरात माई आढळल्याची माहिती नागपूर पोलिसांनी दिली. तुमसर येथील महिला पोलीस उपनिरीक्षक मेसरे यांच्या नेतृत्वात एक पोलिसांचे पथक दूपारी नागपूर येथे रवाना झाले. पोलीस पथकासोबत माईचे आई-वडील गेले आहेत. माई नागपूर बसस्थानक परिसरात गेली कशी, तिचे अपहरण तर झाले नव्हते, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

माईला नागपूर येथून आणण्याकरिता पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. ती तुमसरला आल्यानंतर सविस्तर माहिती मिळेल. आताच काही सांगता येणार नाही, या प्रकरणाची सविस्तर सखोल चौकशी केली जाईल.
- राजेंद्र नागरे
पोलीस निरीक्षक, तुमसर

Web Title: Six-year-old Chimukali was found in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.