रस्त्यांची दैना वाहनधारकांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:38 PM2017-10-25T23:38:28+5:302017-10-25T23:38:38+5:30

गावखेड्यातील रस्ते डांबरीकरणाचे झाले. गुळगुळीत झालेल्या रस्त्यांची अवस्था अपघात अन् मृत्यूची प्रतिक्षा करीत असल्याचे दिसून येते.

Road carriage | रस्त्यांची दैना वाहनधारकांच्या जीवावर

रस्त्यांची दैना वाहनधारकांच्या जीवावर

Next
ठळक मुद्देकान्हळगाव-मोहाडी रस्त्याचे हाल : प्रशासनाला जाग कधी येणार, परिसरातील नागरिकांनी केली रस्ता दुरूस्तीची मागणी.

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : गावखेड्यातील रस्ते डांबरीकरणाचे झाले. गुळगुळीत झालेल्या रस्त्यांची अवस्था अपघात अन् मृत्यूची प्रतिक्षा करीत असल्याचे दिसून येते. त्यातलाच कान्हळगाव ते मोहाडी हा रस्ता पूर्णत: चाळण झाला आहे. तरीही प्रशासन या रस्त्याकडे कानाडोळा करीत आहे. त्यामुळे प्रशासन जनतेच्या सहनशिलतेची परीक्षाच घेत असल्याचे दिसून येते.
डिजीटल इंडिया, बुलेट ट्रेन व मेट्रो आदीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करणाºया शासनाची खेड्यांच्या रस्त्यांची अवस्था कशी आहे, याकडे दुर्लक्ष केले आहे. गावातील रस्ते तालुक्याला डांबरीकरणाने जोडली खरी, पण दुरुस्तीच केली जात नाही असे दिसून येते. कान्हळगाव-मोरगाव- मोहाडी हा रस्ता तीन दशकापूर्वी तयार करण्यात आला.
तथापी, या रस्त्याला पडलेली खड्डे बुजविण्यात प्रशासनाला स्वास्थ्य नाही. मुरम-मातीने खड्डे झाकायचे हा उद्योग केला जातो. पावसाळयात पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती रस्त्याची होते. कंत्राटदारांना हे काम परवडणारे आहेत. कारण डागडूजीच्या नावाखाली मलिंदा चाखायला मिळत असतो. मोहाडी ते मोरगाव- कान्हळगाव हा डांबरीकरण झालेला पाच किलोमीटर अंतराचा रस्ता पूर्णत: उखळला, चाळणी झालेला आहे. बºयाच जागी जीवघेणे खड्डे पडले आहेत.
डांबर बेपत्ता अन् रस्त्याची चाळण झाली आहे. मोहाडीच्या पश्चिमेकडील मोरगाव, महालगाव, कान्हळगाव, सिरसोली, वडेगाव, सालेबर्डी, काटी, पांढराबोडी, हरदोली आदी गावाची रहदारी या रस्त्यांने सकाळपासून रात्रीपर्यंत चालत असते. अतिशय वाईट अवस्था झालेल्या रस्त्याने वाहन चालवित असताना नजर वळती करता येत नाही. नजर चुकली तर अपघात घडलाच म्हणून समजा. अशी भिती येथून मार्गक्रमण करणाºयांना होतो. संवेदनाहित झालेले प्रशासन जनतेच्या सहनशिलतेची कसोटी घेत आहेत.
जनप्रतिनिधी या रस्त्यासाठी बोलायला तयार नाहीत. मागील काही महिन्यापूर्वी चौंडेश्वरी मार्गाची थोडीफार दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पश्चिमेकडील बºयाचशा गावातील वाहने मोरगाव-महालगाव या मार्गाने जात नाही. पण, काही वाहने या मार्गाने जातात त्यांना किती त्रास होतो याचा अनुभव घेणाºयालाच माहित. कान्हळगाव, मोरगाव, मोहाडी या रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील अनेक गावकरी, विद्यार्थ्यांनी केली आहे.
धोकादायक पूल...
महालगाव-मोरगाव नदीवरचा पूल धोकादायक अवस्थेत आहे. पुलाच्यावरचा सिमेंटचा एका भागाचा थर पूरात वाहून गेला. त्या पुलावर मोठा पॅच पडला आहे. तसेच पुलाच्या कडाजवळ मोठे खड्डे पडले आहेत. तीन-चार वर्षापासून पुलाचा वरचा भाग धोकादायक असतानी सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली नाही. इथेही पुलावरील खड्डा मुरमाने भरला जातो. पावसाळ््यात मुरुम वाहून जाते. असा पैश्याचा अपव्यय केला जातो. पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे पावसाळयात या पुलावर पाणी असते. त्यामुळे रहदारी बंद असते. पुलाची तात्काळ दुरुस्ती करावी, या पुलाची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Road carriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.