एका तलाठ्याच्या खांद्यावर १२ गावांचा कार्यभार

By Admin | Published: June 26, 2014 11:06 PM2014-06-26T23:06:52+5:302014-06-26T23:06:52+5:30

खराशी येथील तलाठी कार्यालय मागील दोन महिन्यापासून पुर्णवेळ तलाठी नसल्याने चार्जवर आहे. त्यामुळे सामान्य जनता व विद्यार्थी यांना त्रास सहन करावा लागतो. खराशी येथे पुर्णवेळ तलाठी नसल्याने

The responsibility of 12 villages on one taluka should be done | एका तलाठ्याच्या खांद्यावर १२ गावांचा कार्यभार

एका तलाठ्याच्या खांद्यावर १२ गावांचा कार्यभार

googlenewsNext

खराशी : खराशी येथील तलाठी कार्यालय मागील दोन महिन्यापासून पुर्णवेळ तलाठी नसल्याने चार्जवर आहे. त्यामुळे सामान्य जनता व विद्यार्थी यांना त्रास सहन करावा लागतो. खराशी येथे पुर्णवेळ तलाठी नसल्याने सामान्य जनतेला विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.
खराशी येथे फेब्रुवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात गारपीठ झाली. या कालावधीत लोकांच्या भावनांचा उद्रेक होवून खराशी येथील तत्कालीन तलाठी पिसे यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला.
त्यानंतर पिसे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. मात्र त्यानंतर आतापर्यंत पुर्णवेळ तलाठ्याची नियुक्ती झाली नसल्याने प्रशासन आपल्या कामात किती तत्पर आहे, हे लक्षात येते.मागील दोन महिन्यांपासून खराशी येथील तलाठी कार्यालयाची जबाबदारी पालांदूर येथे पुर्णवेळ नियुक्त असणारे जीवन गेडाम यांच्याकडे आहे मात्र पालांदूर तसेच खराशी दोन्ही परिसरातील एकूण १२ गावांचा कारभार तलाठी गेडाम यांच्या खांद्यावर असल्याने त्यांनाही कसरत करावी लागत आहे. मात्र या सर्व परिस्थितीचा फटका गारपीठग्रस्त शेतकरी, विद्यार्थी यांना सहन करावा लागत आहे.
मात्र त्यांना कार्यरत होण्याचे आदेश न मिळाल्याने खराशी सोबतच अनेक ठिकाणचे तलाठी कार्यालय चार्जवर आहेत. सध्या शेतीच्या हंगामासोबतच शैक्षणिक सत्रही सुरू झाला असून या कालावधीत तलाठी कार्यालयात रोजच काम असते मात्र खराशी येथे पुर्णवेळ तलाठी नसल्याने सामान्य जनतेला विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. खराशी येथे पुर्णवेळ तलाठी द्यावा, अशी मागणी स्थानिक जनता करीत आहे. (वार्ताहर)

Web Title: The responsibility of 12 villages on one taluka should be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.