प्रशिक्षणाच्या तणावात मुख्याध्यापकांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 01:15 AM2018-03-16T01:15:49+5:302018-03-16T01:15:49+5:30

सद्यस्थितीत दहावी परीक्षांचे सत्र सुरु आहे. परीक्षा घेण्याचा ताण, उत्तरपत्रिकांचे गठ्ठे विहित मुदतीत तपासून समिक्षकांकडे देणे, शिक्षण विभागाकडून माहिती मागविण्याचा सपाटा आणि अवेळी घेण्यात येणारे प्रशिक्षण या साऱ्या बाबींचा ताण मुख्याध्यापकांवर आहे.

Principal's victim in training tension | प्रशिक्षणाच्या तणावात मुख्याध्यापकांचा बळी

प्रशिक्षणाच्या तणावात मुख्याध्यापकांचा बळी

googlenewsNext
ठळक मुद्देशाळा सिद्धी प्रशिक्षण : मुख्याध्यापकांच्या वर्गात प्रशासनाबाबत असंतोष

ऑनलाईन लोकमत
भंडारा : सद्यस्थितीत दहावी परीक्षांचे सत्र सुरु आहे. परीक्षा घेण्याचा ताण, उत्तरपत्रिकांचे गठ्ठे विहित मुदतीत तपासून समिक्षकांकडे देणे, शिक्षण विभागाकडून माहिती मागविण्याचा सपाटा आणि अवेळी घेण्यात येणारे प्रशिक्षण या साऱ्या बाबींचा ताण मुख्याध्यापकांवर आहे. याच ताणाचा बळी ओढवायला कारणीभूत ठरले, आजचे शाळा सिद्धीचे प्रशिक्षण.
या तणावात एका मुख्याध्यापकाचा जागीच मृत्यू तर दुसरे मुख्याध्यापक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या घटनेचा मुख्याध्यापक वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. प्रशिक्षणाच्या तणावामुळे मोहरणा येथील गोविंदप्रभू विद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्र ढोके यांचा मृत्यू झाला. दुसरे बेलाटीचे मुख्याध्यापक टिकाराम ठाकरे गंभीररीत्या जखमी झाले, असा आरोप भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जी.एन. टिचकुले, अशोक पारधी, राजकुमार बालपांडे, अविनाश डोमळे, राजकुमार बांते, गोपाल बुरडे आदी मुख्याध्यापकांनी केला आहे.
मुख्याध्यापकांवर कामाचा वाढता भार, वेळोवेळी प्रशिक्षण सभा, माहिती मागविणे आदीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या परिक्षासत्र सुरू आहे. अनेक शिक्षक, मुख्याध्यापक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाºया परिक्षेचे केंद्रसंचालक आहेत. परिक्षक समीक्षक व मुख्य समीक्षक आदीचे कार्य करीत आहेत. विहित मुदतीत पेपर तपासणीचे काम करण्याचा ताण सहन करीत आहेत. अशा तणावपूर्ण काळात प्रशिक्षणाचे ओझे मानगुटीवर असल्याने अनेक मुख्याध्यापकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
भंडारा येथील आठवले समाजकार्य महाविद्यालयात जिल्ह्यातील सातही तालुक्यातील मुख्याध्यापकांचे शाळा सिध्दीचे प्रशिक्षण १०.३० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत ठेवण्यात आले होते. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी ७०-८० किलोमीटर अंतर गाठून गोविंदप्रभू विद्यालयाचे मुख्याध्यापक रविंद्र ढोके व बेलाटीचे मुख्याध्यापक टिकाराम ठाकरे येत होते. प्रशिक्षणाला वेळेवर हजर होण्याचा ताण असल्यामुळे अपघात झाला. अवेळी घेण्यात आलेल्या प्रशिक्षणामुळे या अपघातात मुख्याध्यापकाला जीव गमवावा लागला, असा आरोप मुख्याध्यापकांनी केला आहे.
या अपघाताची माहिती होताच मुख्याध्यापकांच्या प्रशिक्षणस्थळी होताच प्रशिक्षण बंद करण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापक ढोके यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सर्व मुख्याध्यापक प्रशिक्षण स्थळावरुन रूग्णालयात धाव घेतली. त्यानंतरही या घटनेचा मुख्याध्यापकांमध्ये रोष दिसून आला.
प्रशिक्षणस्थळी अव्यवस्था
जिल्हास्तरावर शाळा सिध्दी प्रशिक्षण ठेवण्यात आले होते. यात सातही तालुक्यातील मुख्याध्यापकांना बोलाविण्यात आले. प्रशिक्षणस्थळी जागा अपुरी होती. त्यामुळे बहुतांश मुख्याध्यापकांना जागेअभावी डेस्कवर बसावे लागले होते. सभागृहात मुख्याध्यापक सामावून घेतील एवढी क्षमता नव्हती. त्यामुळे अनेक मुख्याध्यापकांना बाहेर बसण्याची वेळ आली होती. प्रशिक्षण घेण्याची औपचारिकता तेवढी पार पाडली जात होती.

Web Title: Principal's victim in training tension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.