सिहोरा परिसरातील डांबरी रस्त्यांवर खड्डेच खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 09:25 PM2018-07-21T21:25:41+5:302018-07-21T21:26:04+5:30

सिहोरा परिसरात असणारा तुमसर बपेरा राज्य मार्ग आणि गावांना जोडणारे डांबरी रस्ते खड्डेमय झाले आहेत. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनाचे अपघात वाढली आहेत. शासनाने तत्काळ निधी मंजूर करण्याची ओरड परिसरात सुरु झाली आहे.

Potholes in pits on the tar roads in Sihora area | सिहोरा परिसरातील डांबरी रस्त्यांवर खड्डेच खड्डे

सिहोरा परिसरातील डांबरी रस्त्यांवर खड्डेच खड्डे

Next
ठळक मुद्देखड्ड्यात पाणी साचले : अपघातात वाढ, राज्य मार्गाचे अपघाताला आमंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरात असणारा तुमसर बपेरा राज्य मार्ग आणि गावांना जोडणारे डांबरी रस्ते खड्डेमय झाले आहेत. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनाचे अपघात वाढली आहेत. शासनाने तत्काळ निधी मंजूर करण्याची ओरड परिसरात सुरु झाली आहे.
सिहोरा परिसरातून तुमसर बपेरा राज्य मार्ग जोडण्यात आलेला आहे. या राज्य मार्गाची अवस्था वाईट झाली आहे. डोंगरला ते सिहोरा गावापर्यंत राज्य मार्गावर खड्डेच खड्डे तयार झाली आहेत. या खड्ड्यात पाणीसाचत असल्याने वाहनधारकांचे अंदाज चुकत असल्याने अपघातात वाढ झाली आहे. या खड्ड्यामुळे वाहनधारकांनी जीव गमावला आहे. या शिवाय नाकाडोंगरी ते महालगाव या गावांना जोडणारा १८ कि.मी. अंतरचा मार्गावर जागोजागी खड्डे तयार झाली आहेत. या मार्गाने पैदल चालणे मुश्कील झाले आहेत. या मार्गावर असणारी गावे घनदाट जंगलात वास्तव्यास आहेत. याच मार्गावरून रापनिची बस धावत आहे. या शिवाय सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प याच मार्गावर असल्याने नागरिकांची वर्दळ राहत आहेत. परंतु डांबरीकरण मार्गावरील एक ते दोन फुट खोल खड्डे वाहनधारकांवर कसरत करण्याची वेळ आणत आहेत. राज्य मार्ग आणि नाकाडोंगरी हेी दोन्ही मार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग (राज्य) चे अखत्यारीत आहेत. परंतु मार्ग दुरुस्तीकरिता निधी नसल्याचे या विभागाची यंत्रणा सांगत आहेत. सिहोरा परिसरात राज्यमार्गांना गावे जोडण्यात आली आहेत. ग्रामीण भागात असणारे डांबरीकरण रस्त्याचे जाळे जीवघेणे ठरत आहे.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या डांबरीकरण रस्त्याची ८ वर्षापासून डागडुजी करण्यात आली नााही. यामुळे गावात रोष व्याप्त आहे. गावांना जोडणारे डांबरीकरण रस्त्याचे स्वतंत्र नियोजन तयार करण्यात येत नाही. सिलेगाव, परसवाडा गावांना जोडणारे रस्त्यावरील पुलांची उंची वाढविण्यात येत नाही. धनेगाव गावाला जोडणारा रसता पूर्णत: खड्डेमय झाला आहे. महालगाव फाटा सुकळी (नकुल), सिहोरा ते टेमनी सिहोरा ते मुरली, सिलेगाव मार्ग, परसवाडा गावाला जोडणारा रस्ता खड्डेमय असल्याने नाकी नऊ आणत आहेत. या संदर्भात संबंधित विभागांना गावकऱ्यांनी निवेदन दिली आहे. परंतु दुर्लक्ष करण्यात येत असल्याने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

रस्ते दुरुस्तीचे अनुशेष भरून काढण्याचे प्रयत्न सुरु आहे. राज्य शासनाला निधीकरिता पाठपुरावा केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने बपेरा राज्य मार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी.
- धनेंद्र तुरकर
सभापती, जि.प. भंडारा

Web Title: Potholes in pits on the tar roads in Sihora area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.