पोलीस शिपायाचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 12:20 AM2017-10-21T00:20:44+5:302017-10-21T00:20:56+5:30

मित्रांसोबत पोहायला गेलेल्या पोलिस शिपायाचा मृत्यू झाला. रविंद्र मनोहर ठवकर (३५) रा. मेंगापूर (पालांदूर) असे मृताचे नाव आहे.

Police officer drowned in death | पोलीस शिपायाचा बुडून मृत्यू

पोलीस शिपायाचा बुडून मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देपरिसरात शोककळा : निमगाव नाल्यात घडली घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : मित्रांसोबत पोहायला गेलेल्या पोलिस शिपायाचा मृत्यू झाला. रविंद्र मनोहर ठवकर (३५) रा. मेंगापूर (पालांदूर) असे मृताचे नाव आहे. ते उपविभागीय पोलीस कार्यालय देवरी (गोंदिया) येथे गुप्तचर विभागात कार्यरत होते. ही घटना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गुरूवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास निमगाव नाल्यातील बंधाºयात घडली.
रविंद्र हा दिवाळीनिमित्ताने आई-वडिलाकडे मेंगापूर येथे कुटुंबासह आला होता. मित्रांसोबत चर्चा करीत नित्याप्रमाणे पोहण्याचा बेत ठरला. त्याच्यासोबत मित्र चेतन भिमराव काळे (३५), व शिक्षक मनिष पांडूरंग खंडाईत (३३) सोबतीला होते. तिघांनाही पोहचण्याची कला अवगत नव्हती. टयुबच्या साहायाने पोहायचे. घटनेच्या दिवशी वेळी पोहत असताना रविंद्रचा टयुब निसटल्याने तो जोर जोराने ओरडू लागला. क्षणाचाही विलंब न करता त्याला वाचविण्याकरिता टयुब त्याच्याकडे फेकला व स्वत:ही आटोकात दोन्ही मित्रांनी प्रयत्न केले. मात्र रविंद्र खोल पाण्यात बुडाला. यातच त्याचा मृत्यू झाला. भ्रमणध्वनीने घटनेची माहिती मंगेश खंडाईत याला दिली. गोताखोरांना डोहातून रविंद्रचा मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीकरिता पाठविले. रविंद्रच्या मागे पत्नी, मुलगा, आई, वडील, दोन भाऊ, व बहिण असा आप्त परिवार आहे.

Web Title: Police officer drowned in death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.