फिरते पोलीस ठाणे अभियान ठरले ‘रोल मॉडेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 11:58 PM2018-05-15T23:58:17+5:302018-05-15T23:58:17+5:30

मागील तीन वर्षापासून भंडारा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलीस प्रशासनाने नवनवीन प्रयोग केले आहेत.

Police Model 'Role Model' | फिरते पोलीस ठाणे अभियान ठरले ‘रोल मॉडेल’

फिरते पोलीस ठाणे अभियान ठरले ‘रोल मॉडेल’

Next
ठळक मुद्देपोलीस अधीक्षक विनिता साहू : सिटीझन कॉप ठरणार गुन्हेगारीसाठी कर्दनकाळ

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मागील तीन वर्षापासून भंडारा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलीस प्रशासनाने नवनवीन प्रयोग केले आहेत. गावातील वाद गावातच मिटावा, क्षुल्लकशा प्रकरणामुळे त्याचा फटका कुणालाही बसू नये. वेळ, श्रम आणि पैसाची बचत व्हावी यासाठी फिरते पोलीस ठाणे हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाला जनतेचा भरभरून प्रतिसाद लाभत असून आता हा उपक्रम राज्यातील विविध पोलीस ठाण्यात अंमलात आणला असून फिरते पोलीस ठाणे हे ‘रोल मॉडेल’ ठरल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी सांगितले.
फिरते पोलीस ठाण्याच्या यशस्वी प्रयोगानंतर त्या ‘लोकमत’शी बोलत होत्या. राज्यात आजपर्यंत कोणत्याही जिल्ह्यात फिरते पोलीस ठाणे ही संकल्पना नाही. गावात कुणाला तक्रार नोंदवायची असेल तर त्यांना पोलीस ठाण्यात जाण्याशिवाय पर्याय नसतो. परंतु पोलीस अधीक्षक साहू यांनी पुढाकार घेत पोलीस ठाणेच जनतेपर्यंत नेण्याचा संकल्प करून हा उपक्रम सुरू केला.
भंडारा जिल्ह्यातील सातही तालुक्यातील सर्वच पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या लहान मोठ्या गावात फिरते पोलीस ठाणे पथक जावून नागरिकांच्या तक्रारी स्वीकारतात.
या तक्रारींचे निराकरण त्याच ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातो. आतापर्यंत शंभराच्यावर गावात हे फिरते पोलीस ठाणे पथक पोहोचले आणि नागरिकांच्या हजारो तक्रारींचे निराकरण करण्यात आले. हा उपक्रम आजही सुरूच आहे. दरम्यान, या उपक्रमाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा उपक्रम राज्यातील सर्वच जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी या नाविण्यपूर्ण उपक्रमाबद्दल त्यांनी पोलीस अधीक्षक विनिता साहू यांना गौरविले होते.
अवैधधंदेमुक्तीसाठी धाडसत्र
भंडारा जिल्ह्यात आजही मोठ्या प्रमाणात दारूची अवैध विक्री, घरफोडी, वाहनचोरीच्या अनेक घटना घडलेल्या असून २०१६ मध्ये खूनाच्या २३ घटना घडल्या होत्या त्यापैकी २० घटनांमधील आरोपींना अटक करण्यात आली.
दरोड्याचे दोन आणि घरफोडीचे ३९, सोनसाखळी पळवून नेल्याच्या आठ घटना उघडकीस आणले आहेत. त्यापूर्वी आयपीलच्या धाडीत ३० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय जिल्ह्यात कुठेही अवैध व्यवसाय सुरू असल्यास त्याची माहिती देण्यासाठी कक्ष सुरू करण्यात आला असून नागरिकांनी निसंकोचपणे तक्रारी कराव्यात असे आवाहनही केले आहे.
‘निर्भय बनो’ उपक्रमाला प्रतिसाद
शिक्षण घेण्याच्या वयात केवळ आमिषांचे प्रलोभन दाखवून त्यांना पळवून नेण्याचे प्रमाण अधिक आहे. यात समज नसलेल्या लहान मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण खूप आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासत जिल्हा पोलीस प्रशासनाने भंडारा, तुमसर, साकोली आणि पवनी या चारही उपविभागातील शाळांमधील कार्यशाळा घेऊन विद्यार्थिनीमध्ये जनजागृती करण्यात आली. या कार्यशाळेत ज्या विद्यार्थिनीने सहभाग घेऊन हा विषय समजून घेतला त्यांना इतर विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या उपक्रमात जिल्ह्यातील दोन हजाराहून अधिक मुलींनी सहभाग घेतला. या उपक्रमासाठी यशदाचे प्रशिक्षक, डॉक्टर्स, स्त्रीरोग तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे, यासाठी सर्वांना आमंत्रित केल्याचे विनिता साहू यांनी ‘सांगितले.

Web Title: Police Model 'Role Model'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.