तिकिटांच्या आॅनलाईन आरक्षणामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:15 PM2018-11-12T22:15:05+5:302018-11-12T22:15:22+5:30

तिकिटांच्या आॅनलाईन आरक्षणामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण होत असल्याची विचित्र परिस्थीती तुमसर बस आगारात पहावयास मिळत आहे. एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास या ब्रीद वाक्याची सार्थकता म्हणून महाराष्ट्र परिवहन मंडळाने शिवशाही ही खास बस सेवा सुरु केली आहे.

Passengers' confusion due to online reservation of tickets | तिकिटांच्या आॅनलाईन आरक्षणामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ

तिकिटांच्या आॅनलाईन आरक्षणामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ

Next
ठळक मुद्देतुमसर बस आगारातील प्रकार

मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तिकिटांच्या आॅनलाईन आरक्षणामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण होत असल्याची विचित्र परिस्थीती तुमसर बस आगारात पहावयास मिळत आहे. एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास या ब्रीद वाक्याची सार्थकता म्हणून महाराष्ट्र परिवहन मंडळाने शिवशाही ही खास बस सेवा सुरु केली आहे. त्याचे लोकार्पण राज्याचे परिवहन मंत्री यांच्या मार्फत चालू वर्षाच्या सुरुवातीला करण्यात आली होती. शिवशाही ही विना थांब्याची वातानुकुलित बस सेवा म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र एसटीची टिकीट आॅनलाईन पद्धतीनेही आरक्षीत केली जाते याची सामान्य प्रवाशांना साधी कल्पनाही नाही. मात्र त्यामुळेच प्रवाशांमध्ये बस मधील सिटकरीता शाब्दीक वाद हे नित्याचे झाले आहे.
तुमसर बस आगारातून शिवशाही व्यतिरीक्त परिवर्तन डे-आॅर्डनरी, परिवर्तन आॅर्डनरी एक्सप्रेस व डे-आॅर्डनरी या प्रकारच्या बस फेऱ्या प्रत्येक दिवसाला ठरविल्या जातात. त्यात नित्य धावणाºया सर्वसाधारण ते शिवशाही पर्यंत सर्व बसेसकरीता आॅनलाईन टिकीट आरक्षीत केली जाऊ शकते. मात्र त्या सुविधेचा नेमका वापर सुशिक्षीत व तंत्रज्ञानाचा वापर करणाºया प्रवाशी वर्गाकडूनच केला जातो. त्याचाच नेमका त्रास एसटीने प्रवास करणाºया सर्वसाधारण प्रवाशांना सहन करावा लागत आहे. सर्वसाधारण प्रवाशी व आॅनलाईन पद्धतीने टिकीट आरक्षीत करणारा प्रवाशी बसमध्ये नेमक्या सिटकरीता तूतू-मैमै करत असल्याची माहिती समोर आलेली आहे.
महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या संकेत स्थळावर तिकीट आॅनलाईन बुक करण्याचे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मात्र त्या सुविधांबाबतचे फलक तुमसर बस आगारात अद्याप लावण्यात आलेले नाही. माहितीच्या अभावामुळे प्रवाशीच प्रवाशांसोबत शाब्दीक वाद घडवून आणत आहेत. मात्र यावर उपाय म्हणून प्रवाशांमध्ये मध्यस्ती करण्याव्यतिरीक्त बस आगारामार्फत कसलेच प्रयत्न केले जात नाही. तुमसर बस आगारात येणाºया जाणाºया प्रत्येक बसचे प्रीरिकॉर्डेड आॅनलाईन अनाऊंमेन्ट केले जाते. फावल्या वेळेत जाहिरातीचे प्रसारणही केले जाते. मात्र एखाद्या बसमध्ये ठराविक सिट आरक्षित असल्याची किंवा तसे करण्याची माहीती अनाऊंन्स केली जात नाही. दिवसाला येथे हजारो प्रवासी बसने प्रवास करतात.
परिवहन मंडळाच्या लिंकवर कोणत्याही बसकरीता सिट बुक करण्याची सोय करुन देण्यात आली आहे. औपचारिक सुविधेव्यतिरिक्त रेड-बस, गो-आयबीबो या सारख्या खाजगी पोर्टलवरुनही आपल्या आवडीच्या सिटकरीता टिकीट बुक करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र त्या सुविधांच्या प्रसिद्धीचे तुमसर आगाराला विसर पडल्याचे दिसते.

शिवशाहीने तुमसर मार्गे नागपूर प्रवासादरम्यान बस स्थानकावर आरक्षित सिटकरीता प्रवाशांनी शाब्दीक घडवून आणला होता. बस आगारातील अधिकाºयांच्या मध्यस्थीनंतर तो वाद संपुष्टात आला. मात्र सिट आरक्षीत करणाºयाला आपली जागा सोडावी लागली. येथे तुमसर आगारात माहितीचा व नियोजनाचा अभाव दिसून येत आहे.
-संकेत धोत्रे, तुमसर (प्रवासी)

Web Title: Passengers' confusion due to online reservation of tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.