पालांदूर परिसर पावसासाठी आतुरलेलाच

By Admin | Published: July 20, 2015 12:29 AM2015-07-20T00:29:31+5:302015-07-20T00:29:31+5:30

चक्क दोन आठवडे रजेवर असलेला वरुणराजा काल शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हजेरी लावली.

Palandur campus is excited for the rain | पालांदूर परिसर पावसासाठी आतुरलेलाच

पालांदूर परिसर पावसासाठी आतुरलेलाच

googlenewsNext

१७.६ मिमी पावसाची हजेरी : पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल
पालांदूर : चक्क दोन आठवडे रजेवर असलेला वरुणराजा काल शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हजेरी लावली. अवकाशात ढग दाटून आले, गडगडाट सुरु झाला. जोरदार वर्षावाची आस लागली असतानाच आशा निराशेत बदलली. केवळ १७.६ मिमी पावसाची नोंद झाली. काल आठवडी बाजार असतांना पावसाची हजेरी पाहून शेतकऱ्यांसह मजुरांनी काही अंशी समाधान व्यक्त केले. अर्धा तास गर्दी जमली पण पाऊस थांबल्याने जैसे-थे सघडले.
पालांदूर परिसरात कृषी विभागाच्या अंदाजानुसार ११७८४.४५ एकूण हेक्टरपैकी प्रत्यक्षात आवत्या १२७७ हेक्टर, रोवणी १२३०, पऱ्हे ९३७.६४ (नर्सरी), तूर ७४१, हळद १९.८, ऊस १९.९०, केळी ६.२०, भाजीपाला २८.३० इतर ४८.४० हेक्टरवर पिकांची लावगड केली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून धुळपेरणीस आंरभ झाला असून पावसाने ओढताण दिल्याने पिक संकटात आले आहे.
चुलबंध नदीखोऱ्यात स्वतंत्र सिंचन क्षेत्रात ८० टक्के रोवणी आटोपली तर कोरडवाहू शेतीत केवळ १२ टक्के रोवणी उसनवारीवर झाली आहे. नदी, नाले, अजुनही कोरडेच आहेत.
खर्चाची मर्यादा अतोनात वाढल्याने धान शेती पाण्याची सुध्दा परवडणारी राहिली नाही. पऱ्हे करपले असून कालचा पाऊस नर्सरीला जीवनदायिनी ठरला आहे. वेळ कमी असल्याने दुबारपेरणी न करता आहे त्यातच उरकवण्याचा विचार शेतकऱ्यांमध्ये सुरु आहे.
ज्या ठिकाणी रोवणी करण्यात आली तिथे भेगा पडल्याने चिखलही कडक झाला आहे.
यामुळे धानपिक जसा लावला तश्याच स्थितीत आहे. आता पाऊस आला ही तरी उत्पादनात निम्मा, पुरक अपेक्षीत आहे. मऱ्हेगाव फिडरवर पाणी आहे पण वीज नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मागील तीन वर्षांचा दुष्काळ डोक्यावर असतांना पुढचे नियोजन करने शेतकऱ्याला अवघड झाले आहे. उत्साहपूर्वक शेती कसण्याची मानसिकता उरली नाही. कृषी केंद्रात खते, किटकनाशके पडून आहेत.
मागणीच नसल्याने कृषी केंद्रधारकही व्यवसाय कसा राहिल, या विवंचनेत आहेत. उधारीचे प्रमाण वाढून नफयाची टक्केवारी कमी झाली. यामुळे जोडधंदा म्हणून हार्डवेअर, सिमेंट विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या चार दिवसात मोठ्या पावसाची अपेक्षा दिसत नाही. परंतू आठवड्याभरात जर पावसाने जोरदार हजेरी लावली नाही तर रोवणी होणार नाही, असा शेतकऱ्यांचे म्हणने आहे. पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण होईल. जागृत नागरिक आतापासूनच दृष्काळ पाहून खर्च अत्यल्प करित आहे. बाजारपेठेत अजिबात चालना नाही. मंदीचे ग्रहण लागल्याचे विचार पालांदूरचे होलसेल किराणा व्यापारी हाजी इद्रिस लध्धानी, ईकाबाल भुरा, वसंता बारई, शालीक हटवार यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले. (वार्ताहर)

Web Title: Palandur campus is excited for the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.