पारा १२ अंशावर ; बोचऱ्या थंडीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:26 AM2018-12-21T00:26:04+5:302018-12-21T00:26:41+5:30

जिल्ह्यात गार वारे वाहत असल्यामुळे जिल्हावासियांना बोचºया थंडीचा सामना करावा लागत आहे. २० डिसेबर रोजी पारा १२ अंश सेल्सियस नोंदविण्यात आला. थंडीमुळे अनेक नागरीकांच्या आरोग्यावर परीणाम झाला आहे.

Mercury is 12 degrees; The boats start at the cold | पारा १२ अंशावर ; बोचऱ्या थंडीला सुरुवात

पारा १२ अंशावर ; बोचऱ्या थंडीला सुरुवात

Next
ठळक मुद्देसर्दी - पडसे बळावले : आजारांपासून बचाव करण्याचा डॉक्टरांचा सल्ला, उबदार कपड्यांना मागणी वाढली


लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यात गार वारे वाहत असल्यामुळे जिल्हावासियांना बोचºया थंडीचा सामना करावा लागत आहे. २० डिसेबर रोजी पारा १२ अंश सेल्सियस नोंदविण्यात आला. थंडीमुळे अनेक नागरीकांच्या आरोग्यावर परीणाम झाला आहे.
जिल्ह्यात सकाळपासूनच थंड वारे वाहत आहेत. या हवामानामुळे पहाटे दरम्यान कडाक्याची थंडी पडत असून दवबिंदू जमा होत आहेत. ग्रामीण भागासह आता शहरातही सायंकाळी शेकोट्या पेटविणे सुरू झाले आहे. रात्रीला शहरात थंडीमुळे वाहतुकीवर परिणाम जाणवत आहे. रस्ते निमर्नुष्य असतात. रात्री, पहाटेदरम्यान वाहनांची संख्या मार्गावर रोडावलेली दिसून येते. या थंडीमुळे नागरीकांची दिनचर्या सकाळी उशिरा सुरू होत आहे. शहरात ऊनी कापड घेण्यासाठी दुकानांमध्ये नागरीकांची झुंबळ होत आहे. थंडीमुळे नागरीकांच्या आरोग्यावर परीणाम झाला आहे. आज दिवसभर नागरिकांनी थंडीच्या बचवासाठी घोंगडे, स्वेटर, मफलर, कानटोपी शाल आदी उनी कापडांचा वापर केल्याचे दिसून आले़
कारधा स्थित हवामान खात्याच्या नोंदीनुसार गुरुवारला सकाळी कमाल तापमान २१ तर किमान तापमान १२ आणि सायंकाळी कमाल तापमान २५ तर किमान तापमान १४ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले. येत्या काही दिवसात पाºयामध्ये कमालिची घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

थंडीच्या दिवसांमध्ये शरीराच्या तापमानात घट होते. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे सर्दी, खोकला, ताप, अस्थमा, कफसारखे आजार बळावतात. आजारापासून बचाव करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा. गरम कपडे वापरावेत. कोल्ड्रींक्स, डेअरी प्रॉडक्ट खाणे टाळावे. गरज भासल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
-डॉ. यशवंत लांजेवार,
बालरोगतज्ज्ञ, भंडारा.

वातावरणात बदलाने आजार बळावले
मागील चार, पाच दिवसांपासून थंडीचा जोर वाढू लागल्याने वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे तापासह सर्दी, खोकला, अस्थमाने डोके वर काढले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे. यात मुलांची संख्या अधिक आहे. जिल्ह्यात थंडी वाढू लागल्याने वातावरणात बदल होत आहे. सायंकाळपासून वातावरण गारठा जाणवत आहे. वातावरणातील बदलामुळे शहरावर व्हायरल फिव्हरचे सावट पसरले आहे.

गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्डांचा फेरफटका मारला असता, रुग्णांची मोठी गर्दी दिसून आली. सध्या शहरामध्ये विविध आजारांच्या साथीसह सर्दी, खोकला, अस्थमा, दमा आणि तापाचे आजार बळावले आहेत. लहान मुलांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण अधिक दिसून आले आहे. अचानक झालेल्या बदलामुळे आणि थंडीच्या दिवसांमध्ये बहुधा वृद्ध महिला, गर्भवती महिला, लहान मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती कमी होतात. त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या आजारांचा सामना करावा लागतो. एवढेच नाही तर शरीराच्या तापमानात कमालिची घट होते. शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या दिवसांमध्ये धूम्रपान करणाºयांना दम्याचा त्रास जाणवतो. वृद्धांमध्ये ब्रोन्कील अस्थमा, अ‍ॅलर्जिक कफाचे प्रमाण वाढते. मधुमेहींना थंडीच्या दिवसांत प्रकृतीची काळजी घ्यावी लागते. थंडीचा परिणाम जाणवू लागल्यामुळे गत चार ते पाच दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. यामध्ये महिला व मुलांची संख्या अधिक आहे.

Web Title: Mercury is 12 degrees; The boats start at the cold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :weatherहवामान