शिक्षकांना लागले स्व: जिल्ह्याचे वेध ;  शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली प्रक्रियेला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 05:47 PM2018-11-19T17:47:41+5:302018-11-19T17:47:56+5:30

बुलडाणा: जिल्हा परिषद शिक्षकांसाठी आंतर जिल्हा बदली प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याकरीता २० नोव्हेंबर ही अंतीम मुदत आहे. त्यामुळे सध्या शिक्षकांना स्व: जिल्ह्यात बदली घेण्याचे वेध लागले असून या बलदी प्रक्रियेला जिल्ह्यात वेग आला आहे.

inter district transfer process of teachers speed up in buldhana | शिक्षकांना लागले स्व: जिल्ह्याचे वेध ;  शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली प्रक्रियेला वेग

शिक्षकांना लागले स्व: जिल्ह्याचे वेध ;  शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदली प्रक्रियेला वेग

Next

ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: जिल्हा परिषद शिक्षकांसाठी आंतर जिल्हा बदली प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याकरीता २० नोव्हेंबर ही अंतीम मुदत आहे. त्यामुळे सध्या शिक्षकांना स्व: जिल्ह्यात बदली घेण्याचे वेध लागले असून या बलदी प्रक्रियेला जिल्ह्यात वेग आला आहे.
काही महिन्यापूर्वी झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाईन जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. यामुळे अनेक शिक्षकांना मूळच्या शाळेवरून विस्थापित  व्हावे लागले. त्यामुळे बदली प्रक्रियेतील दोष दुरूस्त करून नव्याने बदल्या करण्यात याव्यात, अश्या मागण्या शिक्षक संघटनाकडून करण्यात आल्या होत्या. प्रत्येक टप्प्याची बदली प्रक्रिया  पार पडल्यानंतर त्या टप्प्यात बदली झालेल्या  शिक्षकांच्या  याद्या प्रसिद्ध केल्या नाहीत. जिल्ह्यात बदलीचे आदेश देऊन शिक्षक बदली शाळेवर  हजर झाले. तरीही बदली झालेल्या सर्व शिक्षकांची यादी व विस्थापित शिक्षकांची  यादी प्रसिद्ध केलेली नाही, अशा अनेक समस्या मागील जिल्हांतर्गत  बदली प्रक्रियेमध्ये समोर आल्या होत्या. 
दिवाळीच्या या सुट्टींमध्ये आंतर जिल्हा बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. जे शिक्षक बाहेर जिल्ह्यात आहेत, त्यांना स्व: जिल्ह्यात येण्याची संधी या बदली प्रक्रियेमुळे निर्माण झाली आहे. शिक्षकांच्या आंतर जिल्हा बदलीची ही प्रक्रिया आॅनलाइन असून सुरूवातीला अर्ज करण्यासाठी १५ नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक शिक्षक यामध्ये अर्ज करू शकले नाहीत. त्यानंतर अर्ज करण्याच्या मुदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी २० नोव्हेंबर ही अंतीम मुदत आहे. मुदत संपण्यासाठी एकच दिवस उरल्याने शिक्षकांची धावपळ होत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील अनेक शिक्षक बाहेरच्या जिल्ह्यात असून त्यांना स्व: जिल्ह्यात येण्यासाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. 


जिल्हांतर्गत बदलीची प्रतीक्षा
आंतर जिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू असून काही शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीची प्रतीक्षाल लागली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू होत असून ५ डिसेंबरपासून अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील शिक्षकांचेही या बदली प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. 

...बॉक्स...
महिला शिक्षकांना अडचणी
मागील जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमध्ये अनेक शिक्षकांना अवघड क्षेत्रात टाकण्यात आले. त्यात काही महिला शिक्षकांचाही समावेश आहे. महिलांचा विचार न करता त्यांना अत्यंत दुर्गम भागात किंवा ज्या ठिकाणी कुठलेच वाहन जात नाही, अशा शाळेवर महिला शिक्षकांची बदली झालेली आहे. त्यामुळे महिला शिक्षकांना अडचणी येत आहेत. 


जिल्ह्यात शिक्षकांच्या जेवढ्या रिक्त जागा आहेत, तेवढ्याच ठिकाणी आंतर जिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २० नोव्हेंबर ही अंतीम मुदत असून सर्व प्रक्रिया पारदर्शक आहे. 
- एस. टी. वराडे,
प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.

Web Title: inter district transfer process of teachers speed up in buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.