सीताफळांची आवक वाढली पण भाव वधारलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 09:51 PM2017-10-22T21:51:23+5:302017-10-22T21:51:34+5:30

आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऐन थंडीच्या दिवसात येणारी सीताफळे बाजारात दाखल झाली आहेत. भंडाराच्या बाजारात चांगल्या प्रतीची सीताफळे ९० ते १५० रूपये डझनने विकली जात असून ......

The inflow of the custodians increased, but the prices rose | सीताफळांची आवक वाढली पण भाव वधारलेलेच

सीताफळांची आवक वाढली पण भाव वधारलेलेच

Next
ठळक मुद्देभंडाराच्या बाजारात चांगल्या प्रतीची सीताफळे ९० ते १५० रूपये डझनने विकली

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऐन थंडीच्या दिवसात येणारी सीताफळे बाजारात दाखल झाली आहेत. भंडाराच्या बाजारात चांगल्या प्रतीची सीताफळे ९० ते १५० रूपये डझनने विकली जात असून सर्वच स्तरातील लोकांमध्ये आवडीचा असलेला हा रानमेवा महागला आहे.
भंडारा परिसरात सीताफळाची झाडे मोठ्या प्रमाणात असून इतरही तालुक्यात सीताफळांचे मोठे उत्पादन घेतल्या जाते. शेतकरी दरवर्षी विक्रीसाठी बाजारात सीताफळे आणतात. त्यातून अनेकांना चांगले उत्पन्न मिळते. भंडारा तालुक्यात सीताफळाचे आवर्जुन उत्पन्न घेणारे शेतकरी कमीच आहे. परंतु तालुक्यातील अन्य भागात सीताफळाची अगणित झाडे आहेत.
मागील तीन वर्षाच्या दुष्काळामुळे झाडांच्या संख्येत घट झाली आहे. परंतु यंदा सप्टेंबरच्या तिसºया आठवड्यापासून झालेल्या पावसामुळे डोंगरातील सीताफळांची झाडेही मोहरली आहेत. यंदा डोगरातील झाडांना मोठ्या प्रमाणात फळे लगली आहेत.
शेतजमिनीमध्ये उत्पादित केलेल्या सीताफळापेक्षा माळरानावर नैसर्गिकरीत्या लगडलेल्या सीताफळांची गोडीच न्यारी आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ डोंगरातील सीताफळांची चव चाखण्यासाठी आतुर असतात. मेंढपाळ, पशुपालक दोन महिने ताजी सीताफळे खाण्याचा आनंद घेतात. आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सीताफळे परिपक्व होतात.
पिकण्याअगोदर काढलेली फळे साधारण चार दिवसात पिकतात.मशागतीशिवाय फळे हातात येत असल्याने उत्पादकांना आणि मजुरांनाही त्याची किंमत वाटत नाही.
महिला, शाळकरी मुले सीताफळे तोडून विक्रीस आणतात. त्यांना यातून ४०० ते ५०० रूपये प्रतिदिन रोजगार मिळत आहे. या फळाच्या वाढीपासून ते पिकविण्यापर्यंत कोणत्याही रासायनिक प्रक्रियेचा अवलंब सध्या तरी होत नसल्याने सीताफळाची आवर्जून खरेदी होत असते. शिक्षणासाठी, नोकरीसाठी परगावी असलेली मंडळी दिवाळीच्या निमित्ताने घरी परतल्यामुळे घाऊक प्रमाणात सीताफळाची खरेदी करून त्याचा सामूहिक आस्वाद घेतला जातो. मात्र गोडी वाढण्यासोबतच सीताफळांचे भावही चांगलेच वाढले आहेत.

Web Title: The inflow of the custodians increased, but the prices rose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.