स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही मातीचा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:25 PM2018-06-18T23:25:43+5:302018-06-18T23:25:56+5:30

रस्ते गाव विकासाचे सशक्त प्रमुख माध्यम आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजना देशात व राज्यात राबविली जात आहे. परंतु तुमसर तालुक्यात स्वतांत्र्याच्या सात दशकानंतरही एका राज्य मार्गाला गिट्टी, मुरूम तथा डांबराचा स्पर्श झाला नाही. कर्कापूर-सिलेगाव असे त्या रस्त्याचे नाव आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्याचा विसर पडलेला दिसत आहे.

Even after seven decades of independence, the road of soil | स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही मातीचा रस्ता

स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही मातीचा रस्ता

Next
ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : कर्कापूर-सिलेगाव रस्त्याचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : रस्ते गाव विकासाचे सशक्त प्रमुख माध्यम आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजना देशात व राज्यात राबविली जात आहे. परंतु तुमसर तालुक्यात स्वतांत्र्याच्या सात दशकानंतरही एका राज्य मार्गाला गिट्टी, मुरूम तथा डांबराचा स्पर्श झाला नाही. कर्कापूर-सिलेगाव असे त्या रस्त्याचे नाव आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्याचा विसर पडलेला दिसत आहे.
कर्कापूर-सिलेगाव हा ५ कि़मी. चा मातीचा रस्ता आहे. त्यापैकी २ कि़मी. चा रस्ता अतिशय खराब आहे. माती चिखलमय रस्त्यावरून मार्गक्रमण कसे करावे असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
सदर रस्त्यावर साधी अद्यापपावेतो गिट्टी, मुरूम घालण्यात आली नाही. दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी रविवारी सभा घेऊन असंतोष व्यक्त केला.
याच रस्त्यावर ६५ लक्षाचा पुल बांधण्यात आला. हे विशेष त्याचा उपयोग पावसाळ्यात सध्या होत नाही. चिखलमय मार्गाने कोण जाईल हा मुख्य प्रश्न आहे.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना देशात सुरू आहे. शेतावर जाण्याकरिता रस्ते तयार केले जात आहेत. येथे दोन गावांना जोडणारा रस्ता बांधकाम करण्याकरिता स्वातंत्र्याच्या सात दशकानंरही सुरूवात झाली नाही, हे येथे उल्लेखनीय.
यासंदर्भात पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे, सरपंच प्रल्हाद आगाशे, गणेश सिंदपुरे, महादेव पडोळे, प्रविण मिश्रा, जीवन डहाळे, महादेव आथिलकर, मनोहर माहुले, नारायण सिंदपुरे, रमेश सिंदपुरे, मुकूंदा आगाशे, शैलेश मिश्रा, उपसरपंच आथीलकर, जीवन आगाशे, श्रावण माहुले, राजू आगाशे यासह अन्य नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला.

स्वातंत्र्याच्या सात दशकानंतर कर्कापूर-सिलेगाव रस्ता बांधकाम झाले नाही. यालाच विकास म्हणावे काय, रस्त्याकरिता आंदोलन करावे लागते हे दुदैव म्हणावे लागेल. प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
-हिरालाल नागपुरे,
पं.स. सदस्य तुमसर

Web Title: Even after seven decades of independence, the road of soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.