‘डीपीसी’ ची अभ्यासिका दाखविते नोकरीची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 12:54 AM2018-10-05T00:54:19+5:302018-10-05T00:57:04+5:30

महानगरातील महागडे कोचिंग क्लासेस म्हणजेच स्पर्धा परीक्षेत यश, असा सर्वसामान्यांचा समज. महानगरात जावून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र हमखाश यश मिळेलच याची खात्री नसते.

The DPC's study shows the job | ‘डीपीसी’ ची अभ्यासिका दाखविते नोकरीची वाट

‘डीपीसी’ ची अभ्यासिका दाखविते नोकरीची वाट

googlenewsNext
ठळक मुद्दे‘समाज कल्याण’ : २२ तरुण शासकीय सेवेत रुजू, बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा अभ्यासिका

ज्ञानेश्वर मुंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महानगरातील महागडे कोचिंग क्लासेस म्हणजेच स्पर्धा परीक्षेत यश, असा सर्वसामान्यांचा समज. महानगरात जावून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र हमखाश यश मिळेलच याची खात्री नसते. परंतु याला भंडारा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा अभ्यासिका याला अपवाद आहे. जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपुर्ण योजनेतून दोन वर्षांपुर्वी सुरु झालेल्या या अभ्यासिकेतून तब्बल २२ जण शासकीय सेवेत रुजू झाले आहेत.
स्पर्धा परीक्षेबाबत आजही जिल्ह्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज आणि अनभिज्ञता आहे. केवळ महानगरातील क्लासेसमधूनच यश मिळते अशी त्यांची धारणा आहे. येथेही प्रज्ञावंत आणि हुशार विद्यार्थी आहेत. मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याचे निदर्शनास आले. त्यातूनच अभ्यासिका सुरु करण्याची संकल्पना शासकीयस्तरावर पुढे आली. जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला. येथील तुमसर मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून २६ जून २०१६ रोजी अभ्यासिका सुरु करण्यात आली. याठिकाणी प्रवेश परीक्षा घेवून विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. मे किंवा जून महिन्यात चाळणी परीक्षा घेवून १५० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. याठिकाणी एमपीएससी, युपीएससी, बँकीग आणि इतर स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी साधन सामुग्री उपलब्ध करुन दिली जाते.
या मार्गदर्शन केंद्रामध्ये विविध विषयांची पुस्तके, मासिके, वृत्तपत्रे तर आहेच त्यासोबतच विद्यार्थ्यांना वायफायची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तीन संगणक एक लॅपटॉप, इंटरअ‍ॅक्टिव बोर्ड, प्रोजेक्टर, माईक, स्पिकर, झेरॉक्स मशीन, कोचिंग आदी सोयी उपलब्ध आहे.
विशेष म्हणजे प्रत्येक महिन्या पहिल्या किंवा चवथ्या शनिवारी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले जाते. या अभ्यासिकेत चार हजारपेक्षा अधिक पुस्तके असून आॅनलाईन पध्दतीने परीक्षेची तयारी करवून घेतले जाते. यासाठी लोकप्रतिनिधीचे सहकार्य लाभत आहे. येथील ग्रंथपाल तृप्ती हाताग्रे सांगतात, याठिकाणी येणारा विद्यार्थी हा एक ध्येय घेवूनच प्रवेश करतो. मन लावून अभ्यास करतात. त्यांना आवश्यक असणाºया सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत येथे विद्यार्थी सतत अभ्यास करतात. एकत्र अभ्यास होत असल्याने समुह चर्चेतून विद्यार्थी आपल्या सोडवित असल्याचे त्यांनी सांगितले.
यांना मिळाली नोकरी
प्रदीप बळीराम बडोले (पीओ, सिंडीकेट बँक), सुधीर निळकंठ भांडे (पीओ, आयडीबीआय), प्रफुल्ल उत्तमराव डोंगरे (पीओ, युनियन बँक), सचिन गोपीचंद जमजार (महाराष्ट्र पोलीसदल), कल्याण चेटुले (आरोग्य विभाग), हिमांशु चांदेवार (स्टाफ सिलेक्सन कमीशन), नितेश उईके (कृषी विभाग), अक्षय हिवाळे (विमा कंपनी), सचिन धोटे (सीपीडब्ल्यूडी), चेतन चोपकर (बँक आॅफ बडोदा), हरिश बावनकुळे (बँक आॅफ महाराष्ट्र), अभिजित लोणसरे (बँक आॅफ बडोदा), गोपाल गुघाणे (एमपीएससी), अक्षय बिजवे (ईएसआयसी), संदिप ईश्वरकर (ओवरसिस बँक), कुमूद शेंडे (एमएसआरटीसी), प्रतीक शेंडे (डाक विभाग), हरिश राखाडे (डेपो मॅनेजर एसटी), रविंद्र धुर्वे (एनएसआरटीसी), मंजिरी भागवत (आयडीबीआय बँक) आणि राहुल काळे (एमपीएससी).

पुण्या-मुंबईच्या विद्यार्थ्यांप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील तरुणही स्पर्धा परीक्षेत चमकावे त्यांचा टक्का वाढावा, या उद्देशाने ही अभ्यासिका सुरु करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या अभ्यासिकेत १५० विद्यार्थी सध्या अभ्यास करीत आहेत. भविष्यात विद्यार्थी संख्या वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न असतो.
-आशा कवाडे, सहायक आयुक्त, समाज कल्याण भंडारा

Web Title: The DPC's study shows the job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.