जिल्हा परिषदेच्या जीर्ण झालेल्या वर्गखोल्यांना निर्लेखनाचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:34 AM2018-11-16T00:34:13+5:302018-11-16T00:37:27+5:30

जिल्हा परिषदेच्या जीर्ण झालेल्या वर्ग खोल्या निर्लेखन करण्यास कुणालाच सवड नसल्याने धोकादयक इमारतीत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत आहे. मोहाडी तालुक्यातील अनेक प्राथमिक शाळेची अशी अवस्था आहे. तर काही ठिकाणी निवेदेपूर्वी उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.

Digitize the dilapidated classrooms of Zilla Parishad | जिल्हा परिषदेच्या जीर्ण झालेल्या वर्गखोल्यांना निर्लेखनाचा खोडा

जिल्हा परिषदेच्या जीर्ण झालेल्या वर्गखोल्यांना निर्लेखनाचा खोडा

Next
ठळक मुद्देबांधकाम विभाग निद्रावस्थेत : निविदेपूर्वी भूमिपूजनाची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : जिल्हा परिषदेच्या जीर्ण झालेल्या वर्ग खोल्या निर्लेखन करण्यास कुणालाच सवड नसल्याने धोकादयक इमारतीत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करावे लागत आहे. मोहाडी तालुक्यातील अनेक प्राथमिक शाळेची अशी अवस्था आहे. तर काही ठिकाणी निवेदेपूर्वी उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
तालुक्यातील कान्हळगाव, आंधळगाव, महालगाव, चिचखेडा, पारधी, ताडगाव, खडकी या प्राथमिक शाळा नवीन वर्गखोल्याच्या प्रतीक्षेत आहेत. या सात शाळा जीर्ण व धोकादायक आहे. या शाळांमध्ये १२ वर्गखोल्यांचे बांधकाम प्राधान्याने करण्यात यावे असे शिक्षण विभागाकडून शिक्कामोर्तब करण्यात आला. परंतु या जीर्ण व धोकादायक वर्गखोल्यांच्या निर्लेखनासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना मुहूर्त सापडला नाही. त्यामुळे निविदा काढणे, बांधकाम सुरु करणे आदी काम थांबले आहे. कान्हळगाव येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी नवप्रभात हायस्कुल शेजारच्या शाळेत बसत आहेत. तसेच आंधळगाव, मुंढरी बु., वडेगाव, करडी, पालोरा, मुंढरी खुर्द, मांडेसर, डोंगरगाव, खडकी, जांभोरा, नवेगाव बू., मांडेसर, डोंगरगाव, खडकी, जांभोरा, नवेगाव बू., ताडगाव, पारधी, ढिवरवाडा, सातोना, चिचखेडा या प्राथमिक शाळेमधील ३१ वर्गखोल्या निर्लेखनासाठी मंजूर करण्यात आल्या आहेत. आंधळगाव, रोहणा, मोहगाव करडी, सिरसोली, कान्हळगाव, महालगाव, मोरगाव, काटी, नेरी, बोरगाव, पाहुणी, या प्राथमिक शाळेतील २० वर्गखोल्या धोकादायक ठरविण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषद हायस्कूल जांब, आंधळगाव, डोंगरगाव, मोहाडी, वरठी, करडी, मुंढरी बू., पालोरा येथील हायस्कूलच्या २६ वर्गखोल्या बांधकामासाठी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. तसेच ३० वर्गखोल्या दुरुस्ती योग्य असल्याचे ठरविण्यात आले आहेत. अंमलबजावणीसाठी ना अधिकाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना वेळ नसल्याचे दिसून येत आहे. याचा मनस्ताप विद्यार्थी व शिक्षकांना सहन करावा लागत आहे.
लोकप्रतिनिधीने उरकले भूमिपूजन
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचे जिल्हा परिषदेने निर्लेखन केले नाही. निविदा प्रक्रिया झाली नाही. मात्र माझ्याच पुढाकाराने काम झाले, असे भासविण्यासाठी एका जबाबदार लोकप्रतिनिधींने तालुक्यातील एका शाळेच्या वर्ग खोली बांधकामाचा भूमिपूजन सोहळा उरकून घेतला.

Web Title: Digitize the dilapidated classrooms of Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.