सदनिकेतील कचरा जाळणे सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:41 AM2019-06-10T00:41:13+5:302019-06-10T00:43:10+5:30

स्वच्छ भारत अभियान देशात राबविले जात आहे. रेल्वे प्रशासन रेल्वे प्रवाशी तिकीटावर 'एक कदम स्वच्छता की ओर' असे नमूद करीत आहे. परंतु तुमसर रोड येथे रेल्वे प्रशासनाकडून कचरा दररोज जाळणे सुरू आाहे. गोंदिया मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग जवळ रेल्वे परिसरात हा प्रकार सुरु आहे.

Continues to burn the waste of the trunk | सदनिकेतील कचरा जाळणे सुरूच

सदनिकेतील कचरा जाळणे सुरूच

Next
ठळक मुद्देतुमसर रोड रेल्वे परिसरातील प्रकार : स्वच्छ भारत अभियानावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : स्वच्छ भारत अभियान देशात राबविले जात आहे. रेल्वे प्रशासन रेल्वे प्रवाशी तिकीटावर 'एक कदम स्वच्छता की ओर' असे नमूद करीत आहे. परंतु तुमसर रोड येथे रेल्वे प्रशासनाकडून कचरा दररोज जाळणे सुरू आाहे. गोंदिया मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग जवळ रेल्वे परिसरात हा प्रकार सुरु आहे. कचराची विल्हेवाट लावावी असे निर्देश प्रशासनाने दिले आहे. कचरा जाळू नये असे आदेश असताना मागील अनेक महिन्यापासून कचरा जाळणे सुरुच आहे.
तुमसर रोड रेल्वे जंक्शन असून येथे रेल्वेची कार्यालये तथा रेल्वे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सदनिका आहेत. सदनिकेत दररोज ओला व सुका कचरा निघतो. घंटागाडीद्वारे सदर कचरा गोंदिया मार्गावर रेल्वे क्रॉसिंगजवळ रेल्वे हद्दीतील रस्त्याशेजारी आणून घातला जातो. त्यानंतर सदर कचरा जाळण्यात येत आहे. दररोज कचरा जाळल्याने येथे राख रस्त्याशेजारी पडून आहे.
रेल्वे प्रशासनाने कचराची विल्हेवाट लावावी, परंतु कचरा जाळू नये, असे आदेश दिले आहेत. कचºयावर आधारित प्रकल्प तयार करण्याच्या सूचना प्रत्येक विभागाला देण्यात आली आहे. येथे मागील अनेक महिन्यापासून सर्रास कचरा जाळण्यात येत आहे. तुमसर रोड येथे रेल्वेचे अनेक वरिष्ठ अधिकारी वास्तव्याला आहेत. त्यांचे येथे दुर्लक्ष दिसत आहे. रेल्वे प्रशासन स्वच्छ भारत अभियान मोठा गाजावाजा करून राबवित आहे, परंतु त्या अभियानाचा येथे विसर पडल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक शहर, गावात कचरा जाळण्यास बंदी असताना केंद्र शासनाच्या रेल्वेत मात्र कचरा सर्रास जाळणे सुरुच आहे.

स्वच्छ भारत अभियान राबविणे सुरु असून कचरा जाळण्याची परवानगी कुणी दिली. कचरा जाळल्याने धूर निघून राख तयार होत आहे. त्याची विल्हेवाट कोण लावणार? रेल्वे प्रशासनाने तात्काळ कचरा जाळणे बंद करावे.
-सुधाकर कारेमोरे,
उपजिल्हा प्रमुख,शिवसेना, तुमसर.

Web Title: Continues to burn the waste of the trunk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.