आयुर्वेदावर नागरिकांचा विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 10:32 PM2018-02-16T22:32:33+5:302018-02-16T22:34:40+5:30

प्राचीन काळात जगात जेव्हा अ‍ॅलोपेथी औषध आणि उपचार पध्दती विकसीत नव्हती तेव्हा भारतात चरक सहिता आणि आयुर्वेदिक उपचार पद्धती वापरुन मोठ मोठ्या शस्त्रक्रिया आणि उपचार केले गेले.

Citizens believe in Ayurveda | आयुर्वेदावर नागरिकांचा विश्वास

आयुर्वेदावर नागरिकांचा विश्वास

Next
ठळक मुद्देगिरीष ओक : एक दिवसीय आयुर्वेद पंचकर्म चिकित्सा कार्यशाळा

आॅनलाईन लोकमत
लाखनी : प्राचीन काळात जगात जेव्हा अ‍ॅलोपेथी औषध आणि उपचार पध्दती विकसीत नव्हती तेव्हा भारतात चरक सहिता आणि आयुर्वेदिक उपचार पद्धती वापरुन मोठ मोठ्या शस्त्रक्रिया आणि उपचार केले गेले. याची इतिहासात नोंद आहे. मधल्या काळात आयुर्वेदाकडे थोडी पाठ फिरली. मात्र गेल्या दशकापासून आयुर्वेदाला चांगले दिवस आले आहेत. जनता आयुर्वेदिक उपचार पध्दती आणि औषध स्वत:हून वापरायला लागली आहे. जनतेचा विश्वास आधीपासूनच आयुर्वेदावर असल्याचे प्रतिपादन डॉ. गिरीष ओक यांनी केले.
लाखनी येथे आयोजित निमॉकॉन व आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
लाखनी येथील स्वागत सिलब्रेशन हॉल मध्ये भव्य निमॉकॉन व आयुर्वेद पंचकर्म चिकित्सा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी मंचावर आयुर्वेदिक व्यास पिठाच्या अध्यक्षा डॉ. चारुस्मिता शाहा, दत्तात्रय सराफ, राजेश गुरु, आनंद टेंभुर्णीकर, मृत्यूजंय शर्मा, मोतीला कांबळे, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, डॉ. लीलाधर हारोडे, डॉ. दिलीप फरांडे, मार्केटिंग हेड ओम शिवम बिल्डकॉनचे प्रविण सिदे प्रामुख्याने उपस्थित होते.
ही कार्यशाळा राष्ट्रीय वैद्यकिय संघटना (निमा) व आयुर्वेद व्यासपीठ यांच्या संयुक्त उपक्रमातून आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात डॉ. कमल भुतडा केअर हॉस्पीटल नागपूर यांनी दैंनदिन उपचारात बाह्य रुग्णांना ताटकळत ठेवू नये. तात्काळ उपचार पध्दती यावर मार्गदर्शन केले. तर दुसऱ्या सत्रात पंचकर्म चिकित्सा पध्दती या विषयावर डॉ. आनंद टेंभुर्णीकर, डॉ. माधव आष्टीकर, डॉ. समीर गिरडे, डॉ. मृत्यूंजय शर्मा यांनी तर तिसऱ्या सत्रात अतिसंवेदनशिल परिस्थितीत उपचाराचे तंत्र व नियोजन यावर डॉ. मनोज झंवर यांनी विचार व्यक्त केले.
या कार्यशाळेत संपूर्ण भंडारा जिल्ह्यातून ३२५ डॉक्टर्स उपस्थित झाले होते. यात ज्यांनी जवळपास २५ वर्षे प्राक्ट्रीस केली व रुग्णांची सेवा करीत सामाजिक दायीत्व जपले अशा १०० जेष्ठ डॉक्टरांचा स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक व संकल्पना डॉ. चंद्रकांत निंबार्ते व डॉ. लीलाधर हारोडे यांनी माडली.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. अमित जंवजार यानी केले. आभार प्रशांत चकोले यांनी व्यक्त केले. याचवेळी सिे कलावंत डॉ. गिरीष ओक यांच्या हस्ते निंबार्ते जेनेरिक औषधालयाचे उद्घाटन करण्यात आले. या भव्य अशा कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. चंद्रकांत निंबार्ते अध्यक्ष निमा संघटना, डॉ. केशव कापगते, डॉ. अमित जंवजार, डॉ. लिलाधर हारोडे, डॉ. दिलीप फरांडे, डॉ. गणेश मोटघरे, डॉ. राजेश चंदवानी, डॉ. रवी हलमारे, डॉ. वाघाये, डॉ. अंबादे, डॉ. बोरकुटे, डॉ. अभय साखरकर, डॉ. मुक्ता आगाशे, डॉ. मनिषा निंबार्ते, डॉ. प्रियंका नाकाडे, डॉ. प्रतिीाा बगमारे, डॉ. प्रशांत थोटे, डॉ. प्रशांत चकोले, डॉ. सिध्दार्थ रंगारी, डॉ. अमय हजारे आदीनी सहकार्य करित कार्यशाळा यशस्वी केली.

Web Title: Citizens believe in Ayurveda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.