बेला ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन
By admin | Published: January 28, 2017 12:42 AM2017-01-28T00:42:38+5:302017-01-28T00:42:38+5:30
भंडारा पंचायत समितीची दुसरी ग्रामपंचायत समिती भंडारा अंतर्गत बेला ग्रामपंचायतला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.
भंडारा तालुक्यातील दुसरी ग्रामपंचायत : गाव विकासासाठी मिळणार पुरस्कारामुळे चालणा
भंडारा : भंडारा पंचायत समितीची दुसरी ग्रामपंचायत समिती भंडारा अंतर्गत बेला ग्रामपंचायतला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. संपूर्ण सोयीसुविधांनी युक्त अद्ययावत इमारत, कार्यालयीन कामाचे योग्य नियोजन, ग्रामस्थांना सर्व सोयीसुविधा पुरवठा करणे आदी विविध दृष्टीकोनातून कार्यरत असलेल्या बेला ग्रामपंचायतला आयएसओ मानांकन प्राप्त होण्याचा बहुमान मिळाला आहे. यापूर्वी पंचायत समिती भंडारा अंतर्गत ग्रामपंचायत गणेशपुरला सुद्धा आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे.
आयएओ मानांकनाचा दर्जा मिळविण्याकरीता बेला ग्रामपंचायतने अनेक दिवसांपासून नियोजनबद्ध कामे करून अनेक लोकभिमुख उपक्रम राबवून आपल्या कामामध्ये सातत्य ठेवले आहे. प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छाशक्ती असेल तर केलेल्या परिश्रमाला नक्कीच यश प्राप्त होते. हे बेला ग्रामपंचायतने दाखविले आहे. यावेळी मिळालेल्या यशाबद्दल गावच्या सरपंच शारदा गायधने म्हणाल्या मिळालेले यश हे फक्त पदाधिकाऱ्यांचे किंवा सरपंचाचे वैयक्तीक नसून सर्व गावकऱ्यांनी दिलेल्या व प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेचे असल्याचे सांगितले आयएसओ ग्रामपंचायत करण्याचा अनुषंगाने उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, संजय गाढवे, पोलीस पाटील भिवगडे, तंमुस अध्यक्ष नागपूरे आणि विशेषत: ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थांनी एकत्रित येवून नियोजन करून प्रत्येकानेच खारीचा वाटा उचलत दिलेल्या योगदनामुळेच ग्रामपंचायतीला हा बहुमान मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामविकास अधिकारी कृष्णकुमार नागपुरे यांनी प्रतिक्रिया देतानी म्हणाले की, मिळालेल्या यशामध्ये प्रामुख्याने सरपंच शारदा गायधने, उपसरपंच अर्चना कांबळे, संजय गाढवे, ग्रामपंचायत सर्व सदस्यगण व ग्रा.पं.चे सर्व कर्मचारी तसेच तंमुस अध्यक्ष नागपुरे, पोलीस पाटील भिवगडे व पंचायत समितीचे कुशल मार्गदर्शनामुळे शक्य झाले आहे.
उपसरपंच अर्चना कांबळे यांनी याद्दल प्रतिक्रिया देताना ग्रामस्थानी कामे योग्य वेळेत कोणतीही टाळाटाळ न करता केल्यामुळेच गावकऱ्यांना उस्फूर्त प्रतिसाद व अधिकाऱ्यांचे योग्य मार्गदर्शन यामुळे बेला ग्रामपंचायतीची वाटचाल सुरू असल्याचे सांगितले तसेच बेला ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन मिळाल्याने सभापती प्रल्हाद भुरे, उपसभत्तपती ललीत बोंद्रे, गट विकास अधिकारी मंजुषा ठवकर, विस्तार अधिकारी बोदेले, प्रमोद हुमणे यांनी बेला ग्रामपंचायतीला वेळोवेळी मार्गदर्शन केले. (शहर प्रतिनिधी)