तुमसरात गारांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:31 PM2018-02-14T22:31:46+5:302018-02-14T22:32:21+5:30

मंगळवारी रात्री तुमसर शहरासह देव्हाडी, खापा, मांगली, तामसवाडी, हसारा आदी गावात गारांचा पाऊस पडला. रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान मेघगर्जनेसह सुसाट वाºयासह गारांचा वर्षाव झाला.

All the hail | तुमसरात गारांचा पाऊस

तुमसरात गारांचा पाऊस

Next
ठळक मुद्देगारांचा आकार मोठा : जीवीतहानी टळली, अनेक वाहनांच्या काचा फुटल्या

आॅनलाईन लोकमत
तुमसर : मंगळवारी रात्री तुमसर शहरासह देव्हाडी, खापा, मांगली, तामसवाडी, हसारा आदी गावात गारांचा पाऊस पडला. रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान मेघगर्जनेसह सुसाट वाºयासह गारांचा वर्षाव झाला. प्रथम नागरिकांना काहीच कळले नाही. मोठा आवाज झाल्याने नागरिकांनी बाहेर पडून दृष्य बघितले. अनेक वाहनांच्या काचा फुटल्या, नशीब बलवत्तर म्हणून गायमुख यात्रा परिसरात केवळ पाऊस पडला. गारा पडल्या नाही. येथे मोठा अनर्थ टळला.
मंगळवारी रात्री ८.३० च्या दरम्यान आकाशात ढग दाटून आले. अचानक सुसाट वारा सुरु झाला. आकाशात मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट सुरु झाला नाही. काही क्षणात गारांचा पाऊस सुरु झाला. अतिशय वेगाने बर्फाचा वर्षाव नागरिकांनी ‘याची देही याचा डोळा’ बघितला. हौस म्हणून तरूण व बच्चे कंपनीने गारा हातात, भांड्यात गोळा केल्या. गारांचा आकार मोठा असल्याने गारा तीन ते चार तास विरघळल्या नाही. रस्त्यावरील वाहने जागीच थांबली होती. नागरिक सुरक्षित स्थळी थांबले. काही क्षण काय घडत आहे त्याचा डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. अशा गारा २५ वर्षापूर्वी पडल्या होत्या, अशी माहिती तुमसर शहरातील वयोवृद्ध नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
तुमसर शहरातील शहर वॉर्डात, गोवर्धन नगर, बोस नगर, इंदिरा नगरासह संपूर्ण शहरात गारांचा वर्षाव झाला. एका कौलारू घराला तडे गेले. गायमुख यात्रा परिसरात पाऊस पडला. गारांचा वर्षाव झाला नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

तुमसर शहरासह नजीकच्या गावात गारांचा वर्षाव झाला. या संबंधात माहिती घेणे सुरु आहे. पिकाचे नुकसानीची माहिती गोळा करणे सुरू आहे.
-गजेंद्र बालपांडे,
तहसीलदार तुमसर.

Web Title: All the hail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.