राज्यमार्गावर घडताहेत अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 01:14 AM2019-05-08T01:14:40+5:302019-05-08T01:15:06+5:30

रस्ता रूंदीकरणामुळे सर्वांनाच फायदा होणार असला तरी मात्र या सरू असलेल्या कामामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक, धारक तथा प्रवाशांनी मात्र जीव मुठीत घेऊन दररोज प्रवास करावा लागत आहे.

Accidents occurring on the highway | राज्यमार्गावर घडताहेत अपघात

राज्यमार्गावर घडताहेत अपघात

Next
ठळक मुद्देरस्ता रूंदीकरणात धूळ आणि धोकाही कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : रस्ता रूंदीकरणामुळे सर्वांनाच फायदा होणार असला तरी मात्र या सरू असलेल्या कामामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालक, धारक तथा प्रवाशांनी मात्र जीव मुठीत घेऊन दररोज प्रवास करावा लागत आहे.
दिवस उन्हाळ्याचे असले तरी धुळ होणार नाही आणि त्यामुळे अपघात होणार नाही. त्यासाठी कंत्राटदाराने काळजी घ्यावी, अशी मागणी सध्या जोर धरत आहे. ज्या ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत अशा मुरूम मातीच्या रस्त्यावर प्रमाणशीर नियमित पाण्याचा सिरकाव होणे गरजेचे आहे. आता अशा ठिकाणी कंत्राटदाराने तात्काळ वेळेच्या आधीच लक्ष घालण्याची मागणी यावेळी हजारो ग्रामस्थ व प्रवासी करताना दिसत आहे.
या आधी काही दिवसाआधी याच रस्त्यावर अड्याळ येथील साहिता नगरजवळ एक अपघात घडला. त्यात दोघांचा नाहक बळी गेला. तसेच दोन दिवसाआधी नशिब बलवत्तर म्हणून चारही जीव वाचले. परंतु दुचाकीधारकांना आजही आणि पावसाळ्यात पुढेही सुद्धा असाच त्रास जर होत राहिला तर मग दुचाकीधारक चालकांनी करायेच तरी काय, असाही सवाल ग्रामस्थ विचारीत आहेत.
रस्ता सुरू असलेल्या ठिकाणावरून प्रवास तथा दुचाकी चालकांनी जर डोक्यात हेल्मेट घातले असेल तर धुळीचा त्रास पाहिजे, त्या प्रमाणात होणार नाही आणि अपघात झाल्यास डोक्याची सुरक्षा होवून जीवही जावू शकणार नाही परंतु हेल्मेट सक्ती मोहीम शिथील झाली असली तरी आजही काही सुज्ञ दुचाकी वाहन चालक नेहमी हेल्मेटचा वापर करताना दिसतात.
महामार्गाचे काम तब्बल दोन ते तीन वर्षे लागणार असल्याची प्राथमिक माहिती असली तरी कामात गती आणि अपघात वारंवार होणार नाही आणि त्यात नाहक एखाद्याचा जीव जाणार नाही याची काळजी घेणे हे अतिआवश्यक झाले आहे. कारण बºयाचदा अपघात झाल्यावर तथा अपघातात निष्पाप जीव गेल्यावर जनआक्रोशाचा सामना प्रशासनाला करावा लागत असला तरी त्याची झळ सामान्य माणसाच्या वाटेलाच येताना दिसते.

Web Title: Accidents occurring on the highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.