वनक्षेत्रातून रेती वाहतूक रोखणाऱ्या वनरक्षकाच्या अंगावरच घातला ट्रॅक्टर

By गोपालकृष्ण मांडवकर | Published: August 31, 2023 04:42 PM2023-08-31T16:42:26+5:302023-08-31T16:44:36+5:30

रेती चोरांची दादागिरी वाढली : महिनाभरातील दुसरी घटना

A forest guard who was blocking the transport of sand from the forest area was hit by a tractor, one detained | वनक्षेत्रातून रेती वाहतूक रोखणाऱ्या वनरक्षकाच्या अंगावरच घातला ट्रॅक्टर

वनक्षेत्रातून रेती वाहतूक रोखणाऱ्या वनरक्षकाच्या अंगावरच घातला ट्रॅक्टर

googlenewsNext

भंडारा : बेलगाव (वडगाव) येथील वनसंरक्षित कक्षातून रेतीची ट्रॅक्टरमधून सुरू असलेली चोरटी निर्यात रोखण्यासाठी रात्री हंगामी वनमजुरांसह घटनास्थळी गेलेल्या मांडवीचे वनसंरक्षक अजय उपाध्ये यांच्या चक्क अंगावरच ट्रॅक्टर घातल्याची घटना घडली. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात दाखल करावे लागले आहे. 

ही घटना बुधवारी (३० ऑगस्ट) रात्री अकरा ११.३० वाजताच्या सुमारास घडली. मांडवीचे वनसंरक्षक असलेले अजय उपाध्ये यांना गोपनीय सुत्रांकडून बेलगाव (वडेगाव) येथील कक्ष नवीन कक्ष क्रमांक १३३ या संरक्षित वनामधून काही व्यक्ती अवैधपणे रेतीची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे हंगामी वनमजूर राहुल कोडवते (सालेहेटी) आणि चिंधी मेश्राम (बेलगाव) या दोघांसह मांडवी गावातील बाजार चौकात पोहोचले. तिथून एका चारचाकी खाजगी वाहनाने ते बेलगाव येथे पोहोचून रस्त्याच्या कडेला वाहन उभे केले. नंतर जवळपास एक किलोमीटर अंतर पायी चालत जावून बेलगाव (वडेगाव रिठी) येथील कक्ष क्रमांक १३३ मध्ये पोहचले.

या संरक्षित वनाला लागून असलेल्या वैनगंगा नदीपात्रामध्ये सुमारे ५० ट्रॅक्टर नदीतून अवैधपणे रेतीचा उपसा करत असल्याचे त्यांनी पाहिले. यानंतर एक व्यक्ती रेती भरलेला ट्रॅक्टर घेऊन संरक्षित वनातून येत असल्याचे दिसल्याने त्यांनी या ट्रॅक्टर चालकाला थांबण्याची सूचना केली. मात्र तो ऐकत नसल्याने उपाध्ये आडवे झाले असता ट्रॅक्टर चालकाने थेट त्यांच्या अंगावरच ट्रॅक्टर चालविला. यामुळे त्यांच्या डोक्याला तसेच, डोळे, नाक, हात, पायाला गंभीर दुखापत झाली.

रात्रीची घटना असल्यामुळे संबंधित हल्लेखोर वाहन चालक पळून गेला. यामुळे वाहन क्रमांक किंवा संबंधित ट्रॅक्टर चालकाला ओळखता आले नाही. या घटनेनंतर सोबतच्या वनमजुरांनी त्यांना भंडारा येथील एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता कक्षात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी भादंवी १२० (बी), १४१, १४३, १४५, १४७, १४९, ३०७, ३२१, ३२३, ३३९, ३५१. ३५३, ५०९ नुसार गुन्ह्याची नोंद केली आहे.

एका व्यक्ती ताब्यात

दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी बेरोडी येथील संदीप उमराव मेश्राम नामक एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधित ट्रॅक्टरही ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

महिनाभरातील दुसरी घटना

भंडारा जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात घडलेली ही दुसरी घटना आहे यापूर्वी पवनी तालुक्यातील रेती घाटावर नायब तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर चालवण्याची घटना घडली होती. त्यानंतर ही दुसरी घटना घडली आहे.

संरक्षण द्या- वन कर्मचाऱ्यांची मागणी

जिल्ह्यात दिवसेंदिवस रेती चोरांचे मनोधैर्य वाढत असून त्यांच्यावर कारवाई मात्र नाममात्र होत आहे. यामुळे आम्ही जंगलाचे आणि महसुलाचे रक्षण कसे करावे, असा प्रश्न अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून उपस्थित होत आहे.

Web Title: A forest guard who was blocking the transport of sand from the forest area was hit by a tractor, one detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.