पाच वर्षांत ४५ जणांचा मृत्यू

By admin | Published: July 24, 2015 12:39 AM2015-07-24T00:39:16+5:302015-07-24T00:39:16+5:30

पाणी तथा किटकजन्य आजारामुळे मागील पाच वर्षात ४५ जणांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागातर्फे ...

45 deaths in five years | पाच वर्षांत ४५ जणांचा मृत्यू

पाच वर्षांत ४५ जणांचा मृत्यू

Next

किटकजन्य आजाराचा फटका : आरोग्य विभागातर्फे प्रतिरोध जनजागृती मोहिम
भंडारा : पाणी तथा किटकजन्य आजारामुळे मागील पाच वर्षात ४५ जणांचा मृत्यू झाला. आरोग्य विभागातर्फे विविध उपक्रम तथा मोहिम राबविण्यात असतानाही जनजागृती अभावी किटकजन्य आजारामुळे हे तथ्य समोर आले आहे. विशेष म्हणजे हिवताप विभागातर्फे मागील पाच वर्षात १९ लक्ष ४९ हजार ५९२ जणांची रक्तचाचणी करण्यात आली असून त्यापैकी ९६२ नमुने पॉझिटीव्ह आढळले आहे.
जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने दरवर्षी किटकजन्य आजारासंदर्भात नियंत्रण तथा उपाययोजना करण्यात येत आहे. सन २०१० ते २०१४ या पाच वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यात हिवताप, जॅपीनीज एंसेफलायटीस, चंडीपुरा, डेंगी, व्हायरल इंसेफलायटीस या आजारामुळे ४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सन २०१० मध्ये चंडीपुरा आजारामुळे १२ जणांचा मृत्यू झाला. डेंग्युमुळे २०१२-१४ या कालावधीत १८ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. व्हॉयरल इंसेफलायटीस या आजाराच्या लागणमुळे १५ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे मागील पाच वर्षात हिवतापामुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही.
अतिसंवेदनशील ५२ गावांमध्ये फॉगिंग करण्यात येणार आहे. यात जिल्ह्यात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असलेल्या गावांमध्ये किटकनाशक औषधांची फवारणी करण्यात येणार आहे. जनजागरण मोहिमेचा उद्देश गावपातळीवर किटकजन्य आजाराचे लक्षणे व उपचार व प्रतिरोधाचे विविध उपाययोजनांची माहिती जनतेपर्यंत योग्य त्या माध्यमांद्वारे पोहचविणे आहे. डास उत्पत्ती स्थाने नष्ट करुन प्रतिबंध उपाययोजनामध्ये लोकसहभाग वाढविणे, रुग्ण आढळल्यास त्यावर उपचार करणे असा आहे. (प्रतिनिधी )
आरोग्यविभागातर्फे जनजागृती मोहिम
किटकजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्यासंदर्भात जिल्हा आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात ३० सप्टेंबर २०१५ पर्यंत प्रतिरोध जनजागरण मोहिम राबविण्यात येणार आहे. यात जिल्ह्यातील ५२ गावांमध्ये फॉगिंग करण्यात येणार आहे. या आशयाची माहिती आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली. निंबाळकर म्हणाले, सदर मोहिम ३० सप्टेंबरपर्यंत घेण्यात येणार आहे. यात नागरिकांना किटकजन्य आजारासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना व काळजी घेण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी गावा गावात सर्व्हेक्षण व गृहभेट देणार आहे. तसेच किटकशास्त्रीय सर्व्हेक्षण व जैविक नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे. दरम्यान दि. ३१ जुलैपर्यंत प्रत्येक शाळांमध्ये डेंग्यु जागृती मोहिम राबविण्यात येत असल्याची माहितीही निंबाळकर यांनी दिली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक देवेंद्र पातुरकर यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: 45 deaths in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.