स्वामी विवेकानंदांचे 'हे' बारा विचार पाठ करून आचरणात आणले तर तुमचं आयुष्य बदलून जाईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 07:00 AM2024-01-12T07:00:00+5:302024-01-12T07:00:02+5:30

National Youth Day 2024: आज स्वामी विवेकानंद यांची जयंती, त्यानिमित्ताने आपणही आपले चरित्र त्यांच्यासारखे घडवण्यासाठी त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊया.

Swami Vivekananda's 'These' twelve thoughts will change your life if you recite them and put them into practice! | स्वामी विवेकानंदांचे 'हे' बारा विचार पाठ करून आचरणात आणले तर तुमचं आयुष्य बदलून जाईल!

स्वामी विवेकानंदांचे 'हे' बारा विचार पाठ करून आचरणात आणले तर तुमचं आयुष्य बदलून जाईल!

१२ जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्या देशात तरुणांची संख्या जास्त असल्याने, आपल्या देशाला तरुणांचा देश असेही संबोधतात. परंतु, आजच्या तरुणाईला सुयोग्य विचारांचे वळण देणे अतिशय महत्वाचे आहे. यासाठी त्यांच्यासमोर स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा, विचारांचा आदर्श असायला हवा. हे विचार केवळ सुविचार नाहीत, तर यशस्वी जीवनाचे मंत्र आहेत. ते युवकांनी आत्मसात करावेत आणि स्वामीजींप्रमाणे आपल्या देशाचे नाव जगभरात गाजवावे, यासाठी काही निवडक विचारांची शिदोरी. 

>> उठा, जागे व्हा आणि जोपर्यंत लक्ष्य प्राप्त करत नाही तोपर्यंत थांबु नका.  

>>स्वतः चा विकास करत रहा. लक्षात ठेवा गती आणि वाढ ही तर जिवंतपणाची लक्षणे आहेत.   

>>या विश्वातील सर्व शक्ती आपल्याकडे आहेत. परंतु आपण आपल्या डोळ्यावर हात ठेवतो आणि किती अंधार आहे म्हणुन रडत बसतो.   

>>सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे. कारण, हे पाप कालांतराने मनुष्याला दुर्बळ बनविते.  

>>कधीही कुणाची निंदा करु नका. जर तुम्हाला त्यांना मदतीचा हात पुढे करायचा असेल तर नक्कीच पुढे करा, नसेल तर हात जोडा. आपल्या भावनांनी त्यांना सदीच्छा द्या व त्यांना त्यांच्या मार्गावरून जाऊ द्या.   

>>दिवसातून एकदा तरी स्वत:शी बोला, अन्यथा आपण या जगातील एका उत्कृष्ट व्यक्तीशी संवाद हरवून बसाल.   

>>आयुष्यात जोखीम घ्या. जिंकलात तर नेतृत्व कराल आणि हरलात तर मार्गदर्शन कराल.   

>>जग ही एक मोठी व्यायामशाळा आहे; जिथे आपण स्वतःला मजबूत बनविण्यासाठी आलो आहोत.  

>>जे कोणी आपल्याला मदत करतात, त्यांना विसरू नका. जे कोणी आपल्यावर प्रेम करतात, त्यांचा द्वेष करू नका आणि जे कोणी आपल्यावर विश्वास ठेवतात त्यांना फसवू नका.   

>>कधीच स्वतःला कमी समजू नका.   

>>ज्या गोष्टी तुम्हाला दुर्बल बनवीत आहेत, अशा गोष्टी विष आहेत, असे समजून त्यांचा त्याग करा.  

>>एका वेळी एकच गोष्ट करा आणि ते करत असताना आपले सर्व लक्ष त्या गोष्टीवरच केंद्रित करा.  

>>मेंदू आणि ह्रदय या दोघात संघर्ष चालु असेल, तर नेहमी ह्रदयाचे ऐका.   

>>कोणत्याही गोष्टीची मनात भीती बाळगू नका तरच तुम्ही अद्भुत काम करू शकाल आणि हा निर्भीडपणाच तुम्हाला परम आनंद देईल.   

>>मनाची शक्ती ही सूर्याच्या किरणांसारखी असते. जेव्हा ती एका केंद्रबिंदूवर केंद्रित होते तेव्हाच ती प्रखरतेने चमकते.  

>>जर आपले व्यक्तिमत्त्व सुंदर नसेल तर सुंदर दिसण्याला काहीच अर्थ नाही. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.  

Web Title: Swami Vivekananda's 'These' twelve thoughts will change your life if you recite them and put them into practice!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.