Maghi Ganeshotsav 2024: बाप्पाची मूर्ती सजीव वाटतेच, पण 'या' मूर्तीत चक्क ऐकू आले बाप्पाच्या हृदयाचे ठोके!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 08:04 AM2024-02-13T08:04:09+5:302024-02-13T08:05:23+5:30

Maghi Ganeshotsav 2024: अयोध्येतील रामललाची मूर्ति प्राणप्रतिष्ठेनंतर जशी सजीव वाटू लागली, तसाच अनुभव या वरद विनायकाच्या मूर्तीबाबत आला.

Maghi Ganeshotsav 2024: Bappa's idol seems alive, but 'this' idol can actually hear Bappa's heartbeat! | Maghi Ganeshotsav 2024: बाप्पाची मूर्ती सजीव वाटतेच, पण 'या' मूर्तीत चक्क ऐकू आले बाप्पाच्या हृदयाचे ठोके!

Maghi Ganeshotsav 2024: बाप्पाची मूर्ती सजीव वाटतेच, पण 'या' मूर्तीत चक्क ऐकू आले बाप्पाच्या हृदयाचे ठोके!

गणेश चतुर्थीला गणरायची मूर्ती घरी आणल्यावर तिची षोडशोपचारे पूजा करून प्राणप्रतिष्ठा करण्याचा प्रघात आहे. प्राण प्रतिष्ठा म्हणजे निर्जीव मूर्ती सजीव करणे. मंत्रोच्चारांनी त्या मूर्तीमध्ये सजीवत्त्वाचा अंश उतरवणे आणि केवळ मातीची मूर्तीची नाही तर खऱ्या खुऱ्या गणरायची आपण पूजा करत आहोत ही भावना या सोपस्कारामागे आहे. पण खरोखरच तसे केल्याने मूर्तीमध्ये सजीवत्त्व येते का? याबाबत पार्वती मातेने मातीच्या मूर्तीत आणि शालिवाहन राजाने मातीच्या पुतळ्यात आपल्या तपोबलाने प्राण फुंकून सजीवत्त्व दिल्याच्या कथा आहेत. अशीच एक कथा जाणून घेऊया तामिळनाडू येथील नाडी गणेशाची. त्याबद्दल माहिती दिली आहे युगा वर्तक यांनी!

तामिळनाडू मधील हे मंदिर "नाडी गणपती" म्हणून ओळखले जाते, त्याच्या नावामागच कारण ही तसच आहे. पूज्य आदरणीय श्री मौनस्वामी यांना सिद्धी विनायकाची मोठी मूर्ती स्थापित करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते, यासाठी त्यांना आवश्यक विधी आणि अभिषेक करावा लागणार होता..

पूज्य आदरणीय श्री मौनस्वामींनी प्राणप्रतिष्ठा प्रक्रिया सुरू केली तेव्हा काही नास्तिकांनी दगडाच्या मूर्तीत जीव कसा आणता येईल असे म्हणत त्यांची खिल्ली उडवली. मग आदरणीय श्री मौनस्वामींनी त्यांना मूर्ती तपासणीसाठी डॉक्टरांना बोलवण्यास सांगितले.

सर आर्कबाल्ड एडवर्ड हे त्यावेळच्या प्रांताचे ब्रिटिश गव्हर्नर व्हीआयपी अतिथी म्हणून कार्यक्रमाला आले होते आणि तेही हे सर्व ऐकत होते आणि पाहत होते.

नास्तिकांनी पुतळ्याची नाडी तपासण्यासाठी ब्रिटीश डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी मूर्तीची कोणतीही नाडी तपासली असता नाडी आढळली नाही. तेव्हा पूज्य आदरणीय श्री मौनस्वामी म्हणाले, आता मी प्राणप्रतिष्ठा करीन आणि मग तुम्ही पुन्हा तपासू शकता.

प्रतिष्ठापना सोहळ्यानंतर आरतीच्या वेळी मूर्ती हलत असल्याचे आणि मूर्तीच्या हालचालीही दिसत असल्याचे भाविकांच्या लक्षात आले.. शिवाय, मूर्तीच्या नाडीसह हृदयाचे ठोके देखील मनुष्याप्रमाणेच स्पष्टपणे दिसले. ब्रिटीश वैद्यांनी आणि अगदी नास्तिकांनी देखील कसून तपासणी केली आणि त्यांच्या स्टेथोस्कोपद्वारे नाडीचे ठोके स्पष्टपणे आढळले. हे बघून उपस्थित असलेल्याना आश्चर्याचा धक्का बसला..

तिरुनेलवेली जिल्ह्यातील भूवैज्ञानिकांनी पुतळ्याचे परीक्षण केले आणि विचित्र घटनेची पुष्टी केली. ही नाडी काही तास चालू राहिली आणि नंतर पूज्य आणि आदरणीय श्री मौनस्वामींनी सांगितले की आता थांबेल आणि ती थांबली.

पुतळ्याचे परीक्षण करणारे वैद्य किंवा नास्तिक कोणीही त्याचे स्पष्टीकरण देऊ शकले नाहीत, ते विज्ञानाच्या पलीकडचे आहे हे त्यांनी मान्य केले..हीच बाब अलीकडे आपण अयोध्येतील रामललाच्या मूर्तीबाबतही अनुभवली. खुद्द मूर्तीकाराने देखील आपण बनवलेली मूर्ति प्राणप्रतिष्ठेनंतर कायापालट झाली असे म्हटले आहे. ही मंत्रांची, उपासनेची आणि अध्यात्माची ताकद आहे! उगाच नाही म्हंटले जात सत्य सनातन धर्म... माघी गणेश जन्माच्या सर्वांना शुभेच्छा.. गणपती बाप्पा मोरया!

Web Title: Maghi Ganeshotsav 2024: Bappa's idol seems alive, but 'this' idol can actually hear Bappa's heartbeat!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.