Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 03:46 PM2024-04-30T15:46:26+5:302024-04-30T15:48:08+5:30

Guru Gochar 2024: १ मे २०२२४ ते १४ मे २०२५ गुरूचा फेरा सुरू राहणार आहे. त्याच्या परिणाम ग्रहस्थिती तसेच मनःस्थितीवर होणार आहे, त्याबद्दल आताच सतर्क व्हा!

Guru Gochar 2024: The change of guru in Taurus after twelve years will show many auspicious and inauspicious events for the next year; Read on! | Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!

Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!

१ मे २०२४ रोजी दुपारी १२ वाजून ५६ मिनिटांनी गुरु मेष राशी सोडून वृषभ या शुक्राचार्यांच्या राशीत प्रवेश करणार आहेत, हे राशी परिवर्तन १४ मे २०२५ पर्यन्त राहतील, या संपूर्ण वर्षभराच्या काळात गुरु वेगवेगळ्या स्थितीतून जातील, गुरु अस्त पण होतील, वक्री पण होतील, नक्षत्र परिवर्तन पण करतील. ७ मे २०२४ ते ६ जून २०२४ पर्यन्त गुरु अस्ताचा काळ असेल. तसेच दरम्यान शुक्र अस्त पण होत आहे. त्यामुळे या काळात शुभ कार्य वर्ज्य राहतील. ९ ओक्टोंबर ते ४ फेब्रुवारी या काळात गुरु वक्री दिशेत येईल, तसेच नक्षत्र परिवर्तन करतील.  एप्रिल मध्ये कृतिका, जून मध्ये रोहिणी, ऑगस्ट मध्ये मृग, परत नोव्हेंबर रोहिणी तसेच पुढे ही नक्षत्र बदल करतील.  या सर्व ग्रहस्थितीमुळे कोणत्या शुभ घटना घडणार आणि कोणत्या अशुभ घटना घडणार याबद्दल माहिती देत आहेत, गजानन परब गुरूजी.

वृषभ ही शुक्राचार्यांची राशी आहे, सर्व ऋषी मुनिनी देव गुरु बृहस्पती आणि दैत्य गुरु शुक्राचार्य या दोघांनाही, ज्योतिषचे सर्वात शुभ ग्रह मानले आहेत, म्हणून त्यांना आचार्य ही पदवी दिली आहे, तर येथे एक गुरु दुसर्‍या गुरूंच्या घरात, राशीत प्रवेश करत आहेत, गुरु आणि शुक्र दोन्ही ज्योतिष मध्ये साहित्य, सभ्यता, सुंदरता, संतान, सन्मान, धन आणि विवाहचे प्रमुख कारक ग्रह आहेत. मग वृषभ राशीत गुरु सामान्य पणे कसे प्रभावित करतील?

हे दोन्ही ग्रह फूड, फॅशन, फायनान्स, एज्युकेशन, मेडसिन व मीडिया रिप्रेजेंट करतात. वृषभ राशी काल पुरुष कुंडलीत दुसर्‍या भावात येते, जेथे आपण वाणीचा विचार करतो, बोल विषय, कम्युनिकेशन मग सहाजिकच या संबंधित कार्यक्षेत्र असणार्‍या सर्व लोकांना चांगला परिणाम प्राप्त होईल, हे स्थान कुटुंब स्थान पण आहे, धन स्थान पण आहे, म्हणजे धन आणि परिवार साठी वृद्धी करणारे गोचर आहे, हे ह्या राशि परिवर्तनाचे विशेष महत्व आहे. गुरु शुक्र दोन्ही धन सुखाचे ग्रह आहेत त्यामुळे हा एक प्रकारे कुबेर योग बनतो, कोणाला किती धन द्यावे यावर कुबेर देवतेचा अधिकार आहे, वृषभ राशी ही स्थिर राशी आहे, पृथ्वी तत्व राशि आहे, पोषण आणि संग्रह दर्शवते, ही राशी दीर्घ काल चालणारे प्लान दर्शवते आणि गुरु आपला सकारात्मक औरा(आभामंडल) आहे, जर आपण प्रदीर्घ काल चालणारे व्यवसाय करत असाल तर त्यात यश देणारी स्थिति होत आहे. 

या अगोदर गुरु मेष राशीत असताना त्यावर शनीचा दृष्टी योग असल्याने गुरु पूर्ण फलित होत नव्हते, पण वृषभ राशी परिवर्तनात गुरु पुर्णपणे स्वतंत्र स्थितीत राहतील.  केवळ एप्रिल २०२५चा एक महिना शनि चा दृष्टियोग होईल पण ११ महीने स्वतंत्र राहतील त्याचा ही लाभ होईल. येथून गुरु पाचवी दृष्टी केतुवर ठेवतील त्यामुळे केतू पण शांत होईल, गुरु वृषभ राशीतून संचरण करताना कृतिका, रोहिणी आणि मृग या नक्षत्रातून गोचर करणार तर या नक्षत्रांचे स्वामी पण रवी, चंद्र, मंगल हे गुरु चे मित्रच आहेत त्यामुळे गुरु या राशीत शुभ फलितच होतात. गुरु शुक्र दोन्ही ज्ञानाचे ग्रह आहेत या योगात आध्यात्मिक प्रगतिची स्थिति चांगली बनेल, १२ वर्षानी होणारा हा संयोग आपणास ज्ञान देण्यासाठीच होत आहे. 

मग हे गोचर फक्त शुभच फळ देईल का? तर नाही, या जगात केवळ सुखच देणारी गोष्ट परमेश्वराच्या नावाशिवाय दुसरी कुठचीच नाही, इतरत्र काहीना काही कमी नक्कीच राहते, गुरु शुक्राच्या राशीत जातात तेव्हा काही चॅलेंज पण देतात, कारण गुरु-शुक्र दोन्ही आचार्य जरी असले तरी दोन्ही विरोधी पक्षांचे गुरु आहेत, मनुष्य धन प्राप्ती साठी प्रयत्न तर करतोच, पण तो सर्व आपल्या साठीच करण्याचा प्रयत्न करतो, गुरु चे ज्ञान आहे, त्याग आहे, उदारता आहे ती शुक्राच्या स्वार्थात लुप्त होते, हयातून स्वताला वाचवायचे आहे, कारण शुक्र भोग विलासचे प्रमुख ग्रह मानले आहेत, मग या योगात व्यक्ति भ्रमित होऊन अस वागतो की सर्व काही आपल्या साठीच बनवले आहे, सर्व आपल्यासाठीच करण्याचा प्रयत्न असतो, नकारत्मक विचार करतो, एखादी गोष्ट आपण दुसर्‍याला का द्यायची, आपली वेळ खराब असताना आपणास कोणी काय दिले? अशावेळी आपण हे लक्षात घ्यावे की त्याग हा धर्माचे मूळ स्वरूप आहे, जेव्हा आपण आपल्या चांगल्या वेळी, दुसर्‍यांना वाईट वेळेत मदत करतो, तेव्हा आपल्या वाईट वेळेत आपल्या साठी कोण ना कोण मदती साठी धाऊन येत असतो, हाच तर कर्माचा सिद्धांत आहे, म्हणून उदारता बनवून ठेवा. 

आजार : या योगात शारीरिक त्रासात होर्मोनल्स इशू, ब्लडप्रेशर इशू, किडनी, लीवर आणि शरीर स्थूल होण्याचे त्रास पण या योगात होतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. नामस्मरण घेत राहा आणि सत्कर्म करत राहा, हाच गुरूपदेश आहे असे समजा!

Web Title: Guru Gochar 2024: The change of guru in Taurus after twelve years will show many auspicious and inauspicious events for the next year; Read on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.