१७ दिवसांपासून पाण्याची बोंब; महिलांचा मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्येच ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 11:49 PM2019-06-06T23:49:32+5:302019-06-06T23:50:44+5:30

बीड : मागील १७ दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्याने शहरातील स्वराज्यनगर भागातील महिलांनी गुरुवारी नगर पालिकेत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या ...

Water for 17 days; Stretch in women's rights | १७ दिवसांपासून पाण्याची बोंब; महिलांचा मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्येच ठिय्या

१७ दिवसांपासून पाण्याची बोंब; महिलांचा मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्येच ठिय्या

Next
ठळक मुद्देआंदोलकांचा रुद्रावतार पाहून प्रशासन ताळ्यावर : पाणीपुरवठा विभागाला दिले आदेश

बीड : मागील १७ दिवसांपासून पाणी पुरवठा न झाल्याने शहरातील स्वराज्यनगर भागातील महिलांनी गुरुवारी नगर पालिकेत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडला. मागील काही दिवसात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे अनेक भागात अवेळी पाणीपुरवठा होत आहे.
शहरातील जुने आरटीओ कार्यालयाच्या मागील स्वराज्य नगर भागात १९ मे रोजी नगर पालिकेचा पाणी पुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर ६ जूनपर्यंत पाणी पुरवठा झालेला नाही. त्यामुळे पाण्यासाठी या भागातील नागरिकांना परिसरात इतरत्र भटकंती करावी लागत आहे.
स्वराज्य नगर भागाला पाणी पुरवठा ज्या टाकीवरुन केला जाते, त्या टाकीवरुन टॅँकर भरून दिले जात आहेत, मात्र या भागाकडे पाणी पुरवठा करण्याकडे साफ दुर्ल झाले आहे. आज, उद्या पाणी येई या प्रतीक्षेत १७ दिवस होऊनही पाणी पुरवठा न झाल्याने संतप्त महिला व नागरिकांनी थेट पालिका कार्यालय गाठले. मुख्याधिकाºयांच्या दालनात तासभर ठिय्या मांडत सुरळीत व आठ दिवसाआड नियमित पाणी पुरवठ्याची मागणी लावून धरली. वेळीच पाणी पुरवठा न झाल्यास येडशी - औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.
सदरील आंदोलनामध्ये आशा घोडके, मंगल बिडवे, सी. एन. चाळक, राणी कल्याणकर, प्रयागबाई खामकर, र्वो शिंदे, स्वाती काळे, कल्पना सुरवसे, रेखा धांडे, वैशाली काळे, नंदिनी तागड, उर्मिलाराऊत, श्रीनंदा घोडके, वर्षा जोगदंड, संगीता खाडे, त्रिवेणी मानकर, इंदुमती सोळंके, वंदना मुळे, आशा देवकर, राधा रोडगे, अनिता काळे, अनिता विरेकर, जिजाबाई सातपुते, रेखा उबाळे, अरुणा पवार, अंजली सोनवळकर यांच्यासह स्वराज्य नगरमधील महिला, पुरषांनी भाग घेतला.
दरम्यान आंदोलकांचा आक्रमक पवित्रा लक्षात घेत स्वराज्य नगर भागाला तत्काळ पाणी पुरवठा करुन अहवाल सादर करण्याचे आदेश प्रभारी अधिकाºयांनी पाणी पुरवठा विभागाला दिले. स्वराज्य नगरप्रमाणे शहरातील इतर भागातही पाणी टंचाईचा प्रश्न वारंवार जाणवत आहे.

Web Title: Water for 17 days; Stretch in women's rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.