‘शिवसंग्राम’मध्ये विनायक मेटेंनी छाटले प्रदेशाध्यक्ष मस्केंचे पंख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:36 AM2018-09-13T00:36:33+5:302018-09-13T00:36:52+5:30

विधान सभा निवडणुकीला अवकाश असतानाच बीड जिल्ह्यात आतापासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. बीड जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदार संघात सामसूम असताना बीडमध्ये मात्र राजकीय घडामोडींना वेग येत आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना बीड विधानसभा मतदार संघात मात्र अनेकांना आतापासूनच ‘आमदारकी’चे डोहाळे लागत आहेत. याचा परिपाक सर्वप्रथम आ. विनायक मेटेंच्या ‘शिवसंग्राम’मध्ये पहावयास मिळाला.

Vinayak Maitanee chanted the 'Shiv Sangram' | ‘शिवसंग्राम’मध्ये विनायक मेटेंनी छाटले प्रदेशाध्यक्ष मस्केंचे पंख

‘शिवसंग्राम’मध्ये विनायक मेटेंनी छाटले प्रदेशाध्यक्ष मस्केंचे पंख

Next

सतीश जोशी । लोकमत न्यूज नेटवर्क
विधान सभा निवडणुकीला अवकाश असतानाच बीड जिल्ह्यात आतापासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. बीड जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदार संघात सामसूम असताना बीडमध्ये मात्र राजकीय घडामोडींना वेग येत आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना बीड विधानसभा मतदार संघात मात्र अनेकांना आतापासूनच ‘आमदारकी’चे डोहाळे लागत आहेत. याचा परिपाक सर्वप्रथम आ. विनायक मेटेंच्या ‘शिवसंग्राम’मध्ये पहावयास मिळाला.

लिंबागणेश जि.प.सर्कलमधील बेलगावच्या बेलेश्वरमध्ये पालकमंत्री पकंजा मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या रस्ता कामांच्या उद्घाटनप्रसंगी बीडचे भावी आमदार म्हणून राजेंद्र मस्के यांच्या नावाने घोषणाबाजी करून आ. विनायक मेटे यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न झाला. अनपेक्षित झालेल्या या प्रकारामुळे विनायक मेटे हे काही काळ गोंधळले होते, परंतु, स्वत:ला सावरत वेळ निभावून नेताना शिवसंग्राममध्ये असे काही नाही, असे भासविण्याचा प्रयत्न आपल्या भाषणातून केला होता. परंतु, या घटनेनंतर अवघ्या आठ दिवसातच पुणे येथे शिवसंग्रामचा मेळावा घेऊन संघटनात्मक बदल करताना प्रदेश युवा अध्यक्षपदावरून राजेंद्र मस्के यांना हटवून नाशिकच्या उदय आहेर यांची नियुक्ती केली.

बेलगावच्या भाषणाप्रमाणे शिवसंग्राममध्ये सर्वकाही ‘आलबेल’ असले असते तर हा तडकाफडकी बदल झाला नसता. पक्षात राहून आमदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या राजेंद्र मस्के यांच्या महत्त्वाकांक्षेचे पंख त्यांना पदावरून हटवून मेटेंनी छाटले. विशेष म्हणजे या पखांना मेटे यांनीच बळ दिले होते. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत ताणतणाव वाढल्यानंतर राजेंद्र मस्के यांची साथ मेटेंना अपेक्षित होती. कारण हे दोघेच शिवसंग्रामची ओळख होती. परंतु, जसजसा पंकजा मुंडे-मेटे यांच्यातील राजकीय संघर्ष वाढू लागला, तसतसा राजेंद्र मस्के यांचा भाजपाशी घरोबा वाढू लागला होता.

मेटेंसोबत राहून आपली कामे होणार नाहीत, हे लक्षात घेऊन मस्के यांनी काळाची पावले ओळखत पालकमंत्री पंकजा मुंडे यांची मर्जी सांभाळण्यात यश मिळविले. याचे पहिले बक्षीस म्हणून पालकमंत्र्यांनी त्यांच्या जि.प. सर्कलमध्ये रस्त्याच्या कामासाठी भरीव निधी दिला. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी एका दगडात दोन पक्षी मारून राजकारणातील मुत्सद्दीपणा पुन्हा एकदा जिल्ह्यास दाखवून दिला. मेटे आणि मस्के यांच्यात दरी निर्माण करून शिवसंग्राम खिळखिळी केली. नारायणगडाच्या कार्यक्रमापर्यंत मेटे यांनी घोडदौड करीत बीड विधानसभा मतदार संघात जम बसविण्यास सुरूवात केली होती. मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधत बीड जिल्ह्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांनाच शह देण्याच्या प्रयत्नात मेटेच स्वत:च चेकमेट झाले, चार पाऊले मागे गेले.

विधानसभेच्या रणांगणात त्यांना ‘शिवसंग्राम’ करावयाचा असेल तर नव्याने जिवाभावाची माणसे जवळ करावी लागतील. विश्वासू माणसे पारखून त्यांना बळ द्यावे लागेल. नव्याने संघटनात्मक बांधणी करावी लागेल. मागच्या विधानसभा निवडणुकीत बीडमधून त्यांचा थोडक्याने पराभव झाला असला तरी नाउमेद न होता, त्यांनी चुका सुधारत चांगले बस्तान बसविले होते. त्यांना ही अतिआत्मविश्वास नडला. मेटे आणि मस्के यांच्यातील दुहीचा फायदा निश्चितच विरोधक उठविल्याशिवाय राहणार नाहीत. कार्यकर्ता म्हणून काम करणार, असे राजेंद्र मस्के यांनी म्हटले तरी त्यात तथ्यता किती, हा एक प्रश्नच आहे.

Web Title: Vinayak Maitanee chanted the 'Shiv Sangram'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.