बीड जिल्ह्यात २४ तासांत तीन हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 05:54 PM2019-01-19T17:54:28+5:302019-01-19T17:54:32+5:30

अंबाजोगाई शहरात भाजपा नगरसेवक, बीडमध्ये ४७ वर्षीय महिला तर शिरूरमध्ये एका तरूणाची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटना अवघ्या २४ तासांत घडल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

Three murder in 24 hours in Beed district | बीड जिल्ह्यात २४ तासांत तीन हत्या

बीड जिल्ह्यात २४ तासांत तीन हत्या

Next

बीड : अंबाजोगाई शहरात भाजपा नगरसेवक, बीडमध्ये ४७ वर्षीय महिला तर शिरूरमध्ये एका तरूणाची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटना अवघ्या २४ तासांत घडल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अंबाजोगाई येथील नगर परिषदेतील भाजपाचे नगरसेवक विजय शेषेराव जोगदंड (३४) यांची शुक्रवारी (18 जानेवारी)रात्री धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली. भावावर होणार हल्ला सोडवण्यासाठी ते धावले होते. याप्रकरणी भावकीतील राज जोगदंड, मनोज जोगदंड, विजय जोगदंड, अर्जुन जोगदंड, मालू जोगदंड आणि करण  जोगदंड या सहा जणांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील दोघांना अटक केली असून अद्यापही चौघे फरार आहेत. भाऊ नितीन याचे भावकितीलच महिलेसोबत असलेले अनैतिक संबंध विकास यांच्या जिवावर बेतले. हे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

दुस-या घटनेत बीड शहरातील पेठबीड भागातील अयोध्यानगर भागात शिलावती किसन गिरी (४७) या महिलेची भाजी कापण्याच्या बतईने गळा चिरून हत्या करण्यात आली. ही घटना शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. हत्येनंतर संबंधित आरोपीने रक्ताने माखलेली बतई बाजूलाच असणा-या एका विहिरीत टाकून पळ काढला. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंद करणे सुरू होते.

तरूणाला विष पाजले; पाच जणांवर गुन्हा
विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या तरूणास फिर्यादीसह इतर पाच जणांनी विषारी द्रव्य पाजून जिवे मारले. ही घटना शुक्रवारी घडली. नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात ठिय्या मांडल्यानंतर रात्री उशिरा आदिनाथ खेडकर, अनिता खेडकर व तिचा भाऊ रामनाथ आघाव व इतर दोघांविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात माजी सरपंच असलेल्या आदिनाथ खेडकरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 

Web Title: Three murder in 24 hours in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.